सतर्क सुरक्षारक्षकामुळे बंगल्यातून पळाली खिडकी गँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:22+5:302020-12-17T04:25:22+5:30
सिडको एन-३ येथील रहिवासी बागला हे सहकुटुंब घराबाहेर होते. चोरट्यानी त्यांच्या बंगल्याच्या खिडकीची ग्रील काढून आत प्रवेश केला. आतमध्ये ...

सतर्क सुरक्षारक्षकामुळे बंगल्यातून पळाली खिडकी गँग
सिडको एन-३ येथील रहिवासी बागला हे सहकुटुंब घराबाहेर होते. चोरट्यानी त्यांच्या बंगल्याच्या खिडकीची ग्रील काढून आत प्रवेश केला. आतमध्ये कपाट अथवा अन्य वस्तू तोडण्याच्या आवाजाने वृध्द सुरक्षारक्षक सतर्क झाला. त्याने ही बाब लगेच प्रमोद राठोड यांना कळविली. राठोड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. रात्रपाळीच्या गस्तीवरील हवालदार फडतरे आणि इमरान अत्तार यांनी एन-३ येथे धाव घेतली. यानंतर काही वेळातच सपोनि सोनवणे आणि कर्मचारी आले. पोलीस आल्याची कुणकुण लागताच आरोपी चोरटे बंगल्याच्या खिडकीतून बाहेर पडले आणि शेजारील रिकाम्या भूखंडावरून पसार झाले. चोरट्यानी बंगल्यातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. मात्र, सतर्क सुरक्षारक्षक आणि पोलीस यांच्यामुळे बंगल्यातून चोरीला काही गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.