आता सिमेंटचे रस्ते खोदून नवीन पाईपलाईन टाकणार का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:24+5:302020-12-17T04:25:24+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिनी सोबतच शहरात पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईन व जुन्या टाक्या पाडून ...

आता सिमेंटचे रस्ते खोदून नवीन पाईपलाईन टाकणार का
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिनी सोबतच शहरात पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईन व जुन्या टाक्या पाडून तिथे नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे.
व्यापारी महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात पाणी वितरण करणारी पाईपलाईनही जुनी झाली आहे. दर महिन्याला कोणत्याना कोणत्या भागात पाईपलाईन फुटत असते. नवीन सिमेंटचे रस्ते तयार करण्याआधी नवीन पाईपलाईनचे जाळे निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी महासंघाने मनपा आयुक्तांकडे लेखी केली होती. पण याकडे कानाडोळा करून सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहेत. आता शहरातील पाईपलाईन बदलण्यासाठी कोट्यवधी खर्च करून तयार केलेले सिमेंटचे फोडण्यात येणार का, असा प्रश्नही महासंघाने उपस्थित केला आहे.
शहरातील कोटलाकॉलनी, शहागज, सिडको एन ५, एन ७ येथील जलकुंभ जुने झाले आहेत. ते जलकुंभ पाडून तिथे नवीन जलकुंभ उभारण्यात यावे. नवीन पाईपलाईनद्वारे जोरात पाणी शहरात येईल पण तो पाण्याचा दाब शहरातील जुनी पाईपलाईन सहन करू शकणार नाही. यामुळे एकीकडे जायकवाडीहून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करताना शहरातील जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे.