...तर राजकरणातून संन्यास घेईल- जेथलिया

By Admin | Updated: March 22, 2016 01:11 IST2016-03-22T00:08:10+5:302016-03-22T01:11:03+5:30

परतूर: माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास आगामी नगर पालिका निवडणुकीत सहभाग घेणार नाही. सोबतच राजकारणातून संन्यास घेईल,

... will retire from politics - Jethalia | ...तर राजकरणातून संन्यास घेईल- जेथलिया

...तर राजकरणातून संन्यास घेईल- जेथलिया


परतूर: माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास आगामी नगर पालिका निवडणुकीत सहभाग घेणार नाही. सोबतच राजकारणातून संन्यास घेईल, अशी भूमिका माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी सोमवारी मांडली.
पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षाच्या निवडीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना माजी आ. जेथलिया बोलत होते. ते म्हणाले की, राजकीय आकसापोटी व विकास कामांना खिळ घालण्याच्या उद्देशाने विरोधक माझ्यावर बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. काम करताना अनियमितता आढळते मात्र अनियमितता म्हणजे भ्रष्टाचार होत नाही. माझ्या १९९१ पासूनच्या कार्यकाळात आतापर्यंत एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार आढळला तरी मी राजकारणातून संन्यास घेईल. मी राजकारण करताना जाती, धर्माचा विचार करीत नाही. विकास हा केंद्रबिंंदू मानला आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व पालिकेसंदर्भात काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. नगर पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी अतिक्रमण, स्वच्छता, अनधिकृत बांधकाम याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही जेथलिया यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा शेख करीमाबी, मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, अखिल काजी, विजय राखे, इफ्तेखार काजी, इर्शाद अन्सारी, राजेश भुजबळ, मोईन कुरेशी आदी.

Web Title: ... will retire from politics - Jethalia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.