पंजाबचा नवा कॅप्टन आगामी निवडणुकांमध्ये करिष्मा घडवील? ( चर्चा तर होणारच....)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:03 IST2021-09-23T04:03:26+5:302021-09-23T04:03:26+5:30
.................................................... कॉंग्रेसला फायदा होईल..... चरणसिंग चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवून कॉंग्रेसने चांगली खेळी खेळली आहे. त्याचा कॉंग्रेसला फायदा ...

पंजाबचा नवा कॅप्टन आगामी निवडणुकांमध्ये करिष्मा घडवील? ( चर्चा तर होणारच....)
....................................................
कॉंग्रेसला फायदा होईल.....
चरणसिंग चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवून कॉंग्रेसने चांगली खेळी खेळली आहे. त्याचा कॉंग्रेसला फायदा होईल. आगामी विधानसभा निवडणुकांचा यशाचा मार्ग मोकळा झाला आहे. १९६६ ला निर्मिती झाल्यापासून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी शीख समाजातील दलित चेहरा आलेला नव्हता. चन्नी यांच्या रूपाने तो मिळाल्याने पंजाबमधील ३३ टक्के दलित शीख खूष झाला आहे. पंजाब हा शेतकऱ्यांचा प्रदेश असून गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे राहुल गांधी उभे राहत आलेले आहेत. आंदोलक शेतकरी कॉंग्रेसकडेच वळतील. पंजाबमध्ये भाजपला बोटांवर मोजता येतील, इतक्याही जागा मिळू शकणार नाहीत.
- सूरजितसिंग खुंगर, राष्ट्रवादी कॉंग्रेस
..............................................................................
चन्नी चमत्कार करायेगा.....
चरणसिंग चन्नी पंजाबात नक्कीच चमत्कार घडवून आणतील व कॉंग्रेसला विजय मिळवून देतील. भाजपला तर एखाद्दुसरी जागा मिळणे कठीण. १९६३ मध्ये जन्मलेले चन्नी यांच्यात लहानपणापासूनच नेतृत्वगुण होते. त्यांच्यामुळे कॉंग्रेसचे पारडे जड झाले असून, पंजाबातील सारा दलित शीख समाज कॉंग्रेसला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा हे तर आमच्या गावाजवळचे. त्यांचे वडीलही राजकारणी. अनेक वर्षे मंत्री राहिले. रंधावा यांच्यामुळेही कॉंग्रेसचा फायदा होईल.
- जयमलसिंग रंधावा, व्यावसायिक, औरंगाबाद.