अभ्यासाची योग्य पद्धत करेल,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:02 IST2021-04-22T04:02:21+5:302021-04-22T04:02:21+5:30
औरंगाबाद : नेहमी मोठी स्वप्ने बघा. समाजाचे व देशाचे आपण काही देणे लागतो, हे लक्षात ठेवून करिअरची निवड ...

अभ्यासाची योग्य पद्धत करेल,
औरंगाबाद : नेहमी मोठी स्वप्ने बघा. समाजाचे व देशाचे आपण काही देणे लागतो, हे लक्षात ठेवून करिअरची निवड करा. सर्वच क्षेत्रात अटीतटीची स्पर्धा आहे, पण तेवढ्याच संधीही आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच अभ्यासाची योग्य पद्धत निवडली तर नक्कीच करिअर आणि जीवनात यशस्वी व्हाल, असा विश्वास ज्ञानदीप फाउंडेशन सेंटरचे संचालक गोविंद काबरा यांनी विद्यार्थ्यांना दिला.
लोकमत कॅम्पस क्लब आणि डीएफसी यांच्यावतीने बुधवार दि. २१ एप्रिल रोजी सध्या इयत्ता १० वीतून ११ वी मध्ये जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काबरा यांनी विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल, अशा शब्दात मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना काबरा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण वयाच्या २६-२७ व्या वर्षी होते. वयाचा एवढा मोठा टप्पा शिक्षणात जात असल्याने डीएफसीने विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही क्षेत्रांसाठी उत्कृष्ट कोर्सेस तयार केले असून याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे कशी गाठता येतील, याचीही त्यांनी माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, १० वी नंतर पुढील ५ वर्षांतच युपीएससी, एमपीएससीची तयारी करून घेणारा महत्त्वपूर्ण कोर्स डीएफसीने सुरू केला आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेत ११ वी व १२ वीला असणारा कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. विशेष म्हणजे या कोर्समध्ये १२ वी नंतर पुढील ३ वर्षे कमवा व शिका अंतर्गत अभ्यास करून घेण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे व पैशाचे महत्त्व समजेल आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासही होईल.
तसेच सीए, सीएस याशिवाय सीएलएटी म्हणजेच विधी शिक्षण, एमबीएची तयारीही डीएफसी येथे अशाच पद्धतीने करून घेण्यात येईल. आयआयटी, एनईईट, युपीएससी, एनडीए, सीए, सीएस, केव्हीपीवाय या सर्वच परीक्षांमध्ये योग्य नियोजनाद्वारे यश कसे मिळविता येईल, हे देखील काबरा यांनी सांगितले. या सर्व कोर्सेससाठी डीएफसी येथे नवीन बॅच दि. २३ एप्रिलपासून सुरू होत आहे. अधिक माहिती आणि प्रवेशपूर्व परीक्षेच्या माहितीसाठी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर संपर्क साधून मोफत नाव नोंदणी करावी.
चौकट :
यशाचा मार्ग सोपा करणारा चार्ट व हेल्पलाइन
डीएफसी येथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेल्फ स्टडी चार्टच्या मदतीने अभ्यास केल्यास अभ्यासाचा ताण न येता स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे जाते. तसेच चार्टव्दारे विद्यार्थ्यांना रेकॉर्ड किपिंग व आवश्यक स्पर्धात्मक कौशल्याच्या सवयी लागतात. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी डीएफसी येथे विशेष हेल्पलाईन सिस्टिम तयार करण्यात आली आहे.
- (गोविंद काबरा यांचा फोटो )
- कॅम्पस क्लब व डीएफसीचा लोगो )