शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:57 IST

मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे.

ठळक मुद्देनिरीक्षकांच्या मते औरंगाबादला काँग्रेसची संघटनात्मक बांधणीच नाही. स्वबळावर लढण्याचे स्वप्नही पाहत नाहीत

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष नामदेव पवार यांना प्रदेश काँग्रेसवर एखादे पद देऊन नवा शहराध्यक्ष व त्यांच्या जोडीला दलित व धनगर समाजाला प्रतिनिधित्व म्हणून दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा विचार सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे.

मागील लोकसभा निवडणुकीपासून बदलाचे संकेत मिळत होते; परंतु प्रत्यक्षात बदल काही होत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर तर शहराध्यक्ष बदला, अशी मागणी जोर धरू लागली होती. जोरदार लॉबिंगही करण्यात येत होते; परंतु प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, असे सांगितले जाते. सध्या मनपा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. काँग्रेससह सारेच राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज होत आहेत; परंतु काँग्रेससारख्या जुन्या व मोठ्या पक्षाची संघटनात्मक बांधणी औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या व कोणे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहरात अत्यंत कमजोर असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणी नाही. वॉर्डाध्यक्ष नियुक्त केले गेले नाहीत. बुथ कमिट्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रचना वॉर्डावॉर्डांतून बघावयास मिळत नाही. ही परिस्थिती आताही व भविष्यातही काँग्रेसला विजय मिळवू देऊ शकत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत बदल अटळ ठरत असून, ते न करणे ही मोठी चूक ठरू शकते. मनपा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने खरे तर संघटनात्मक बांधणीवर चांगले लक्ष द्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे स्वबळाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसला स्वबळावर फार तर ५० जागा लढवता येऊ शकतील. अनेक वार्डांमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड आहे. 

कालपासून शहराध्यक्ष नामदेव पवार हे मुंबईत आहेत. मध्यंतरी गांधी भवनात येऊन गेलेल्या तीन निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना देऊन टाकला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख हे लवकरच औरंगाबादला येणार असल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षकांच्या मते औरंगाबादला काँग्रेसची संघटनात्मक बांधणीच नाही. मुस्लिम शहराध्यक्ष व एक कार्याध्यक्ष दलित समाजाला व काही वॉर्डांमधील धनगर समाजाचे प्राबल्य पाहता एक कार्याध्यक्ष धनगर समाजाचा करावा, असा प्रस्ताव निरीक्षकांचा असल्याचे समजते. अर्थात, प्रदेशाध्यक्ष थोरात व अशोक चव्हाण यांचे काय मत पडते, यावर सारे अवलंबून आहे.

स्वबळावर लढण्याचे स्वप्नही पाहत नाहीतएकेकाळी महापालिका निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने महापालिकेत काँग्रेसची तयारी असे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेस पक्षाने महापालिकेत काम केले आहे. काही वेळा शिवसेना- भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसने विविध समित्यांचे सभापतीपद भूषविले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचे स्वप्नही पाहत नाही, अशी अवस्था झाली आहे. आता तर आघाडीच्या माध्यमातून काही जागा निवडून येतात का, याची चाचपणी पक्षाकडून होत असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटत आहेत.  

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका