वाळूजमहानगरात महास्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:44 IST2019-05-12T23:44:03+5:302019-05-12T23:44:10+5:30
वाळूजमहानगर परिसरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात प्रतिष्ठानच्या शेकडो स्वंयसेवकासह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

वाळूजमहानगरात महास्वच्छता अभियान
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात प्रतिष्ठानच्या शेकडो स्वंयसेवकासह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी पंढरपुरातुन या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सरपंच शेख अख्तर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पंढरपुरातील जामा मस्जिद चौक, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय ते तिरंगा चौक, रांजणगावरोड ते मिनी बसस्थानक आदी ठिकाणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, महेबूब चौधरी, संगिता गायकवाड, एकनाथ किर्तीकर, एकनाथ सोनवणे आदींनी सहभाग घेतला होता.
त्यानंतर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी बजाजनगरातील मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक, एफडीसी चौक, रांजणगाव फाटा ते एकतानगर-कृष्णानगर, दत्तनगर ते कमळापूर फाटा आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवकांनी मुख्य मार्गावरील रस्ते स्वच्छ करुन जमा झालेला कचरा एका ठिकाणी गोळा केला. सकाळी-सकाळीच परिसरातील मुख्य रस्त्यावर स्वंयसेवकाचे जत्थे परिसर स्वच्छत करताना दिसून आले.