चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:08 IST2018-05-14T01:08:23+5:302018-05-14T01:08:41+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अंगावरील साडीनेच तिचा गळा आवळून खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे शनिवारी रात्री ११ वाजता घडली. अनिता आबासाहेब मगर असे मयत विवाहितेचे नाव आहे.

 The wife's throat buried in the murder of the character | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

शिऊर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अंगावरील साडीनेच तिचा गळा आवळून खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे शनिवारी रात्री ११ वाजता घडली. अनिता आबासाहेब मगर असे मयत विवाहितेचे नाव आहे.
या घटनेविषयी मयत अनिताचे वडील सुदाम पुंडलिक गोरे (रा. दसकुली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिताचा विवाह चिकटगाव येथील बहिणीच्या मुलगा आबासाहेब कचरू मगर याच्याशी गेल्या १८ वर्षांपूर्वी रितीरिवाजाने करण्यात आला. लग्नानंतर पती तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन व मारहाण करीत होता. अनिताला प्रसुतीसाठी दसकुली येथे आणले होते. त्यानंतर तिला मुलगी झाली. जावई सतत मारहाण करीत असल्याने अनिताला तीन वर्षे माहेरीच ठेवले होते. परंतु नातेवाईकांनी मध्यस्ती करून अनिताला सासरी पाठविले. त्यानंतरही पती आबासाहेब तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करीत होता. परंतु आबासाहेब हा माझा भाचा असल्याने मी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली नव्हती. आज ना उद्या तो सुधरेल, या आशेवर अनिता आपला संसाराचा गाडा हाकत होती. परंतु १२ रोजी रात्री या नराधमाने अनिताला मारहाण केली व तिच्याच साडीने गळफास देऊन तिला यमसदनी पाठविले.
या फिर्यादीवरून शिऊर पोलीस ठाण्यात आबासाहेब कचरू मगर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीस रविवारी शिर्डी येथून अटक करण्यात आली. पुढील तपास पो.नि. धनंजय फराटे हे करीत आहेत.

Web Title:  The wife's throat buried in the murder of the character

टॅग्स :Policeपोलिस