प्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीला जाळले

By Admin | Updated: September 20, 2016 00:23 IST2016-09-20T00:20:44+5:302016-09-20T00:23:29+5:30

औरंगाबाद : दुसऱ्या एका महिलेसोबतच्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

The wife, who was caught in the house of love, was burnt to death | प्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीला जाळले

प्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीला जाळले

औरंगाबाद : दुसऱ्या एका महिलेसोबतच्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हिमायतबाग परिसरातील भीमराजनगर येथे १८ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.
कृष्णा उगले (४५, रा. भीमराजनगर) असे आरोपीचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, कृष्णाचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. याबाबतची माहिती त्याची पत्नी संगीता (४२) यांना समजल्यामुळे त्यांच्यात भांडण होत असे. १८ सप्टेंबर रोजी तर कृष्णाने चक्क त्या महिलेचे छायाचित्र घरात लावण्यासाठी आणले. ही बाब संगीता हीस खटकली. त्यांनी दुसऱ्या बाईचे छायाचित्र घरात लावण्यास विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून कृष्णाने संगीताच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्या गंभीररीत्या भाजल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: The wife, who was caught in the house of love, was burnt to death