शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:45 IST

आरोपीचा मुलगा आणि साडूचा मुलगा यांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या

छत्रपती संभाजीनगर : चारित्र्यावर संशय घेऊन चाकू आणि कुऱ्हाडीचे वार करून पत्नी माया हिची निर्घृण हत्या करणारा आरोपी लहू भागाजी साळवे (२७, रा. साताळा, ता. फुलंब्री) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी विविध कलमांखाली जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला.

दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून मयताच्या दोन्ही मुलांना द्यावी. तसेच विधी सेवा प्राधिकरणने भविष्यात योग्य ती भरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

काय होती घटना?मायाचे वडील सुभाष तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मायाचा विवाह लहू साळवेसोबत झाला होता. लहू मूळचा साताळ्याचा आहे. मात्र, तो कामानिमित्त वडिलांसोबत नाशिक येथे राहत होता. माया दोन मुलांसह माहेरी राहत होती. घटनेच्या ४ महिन्यांपूर्वी लहूदेखील सासुरवाडीत राहण्यासाठी आला होता. तो मायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करीत असे. २ जून २०२० रोजी सकाळी सुभाष हे नातवासोबत लामणगाव (ता. खुलताबाद) येथे दुचाकीवर गेले होते. ते परतले असता, त्यांच्या दोन नातवांनी काकांनी मावशीला कुऱ्हाड आणि चाकूने मारहाण केली असून, काका घरातून निघून गेल्याचे सांगितले. घरात माया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. सोफ्याजवळ रक्ताने माखलेला चाकू पडलेला दिसला. मायाला गंभीर जखमी अवस्थेत खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी व शिक्षाखटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी मयत आणि आरोपीचा मुलगा व साडूचा मुलगा यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंगCourtन्यायालय