पत्नीने किडनी दान करून वाचविले पतीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:36+5:302020-12-30T04:06:36+5:30
पिंपळदरी येथील प्रवीण शेषराव चव्हाण (२८) या युवकाची मागील वर्षी लघवीला त्रास होत होता. त्यांनी रुग्णालयात दाखविल्यानंतर त्यांच्या ...

पत्नीने किडनी दान करून वाचविले पतीचे प्राण
पिंपळदरी येथील प्रवीण शेषराव चव्हाण (२८) या युवकाची मागील वर्षी लघवीला त्रास होत होता. त्यांनी रुग्णालयात दाखविल्यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समोर आले. यामुळे सर्व कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. यावेळी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. किडनी दात्याचा शोध सुरू असताना, त्यांची पत्नी वैशाली यांचा रक्तगट जुळून आला. त्यांनी पतीसाठी किडनी दान देण्याचे ठरविले. कोरोनामुळे किडनी प्रत्यारोपण थांबले होते. मात्र, नंतर परवानगी मिळाल्यानंतर प्रवीण चव्हाण यांची औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २३ डिसेंबर रोजी पार पडली. दोघा पती- पत्नीची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. माझ्या पत्नीचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. आज तिच्यामुळेच मला जीवदान मिळाले. यामुळे जीवनभर मी तिचा उपकृत राहील. अशी भावना यावेळी प्रवीण चव्हाण यांनी व्यक्त केली.
कोट
माझ्यासमोर ज्यांच्याशी आयुष्याची गाठ बांधली. त्यांची मरणयातना दिसत होती. त्यांच्याशिवाय माझे हे जीवन अधुरे राहिले असते. त्यामुळे मी मनात कोणताही संकोच न ठेवता किडनी देण्याचा निर्णय घेतला. यापुढेही परमेश्वराने आमची ताटातूट करू नये जेणेकरून मुलाबाळांसमवेत आमचा संसार सुखाचा होईल.
-वैशाली प्रवीण चव्हाण, किडनी दाता,
फोटो : प्रवीण चव्हाण, वैशाली प्रवीण चव्हाण.