शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला साडी नेसता येत नाही, मला ती पसंत नाही;‘आय क्वीट’ स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:31 IST

व्हॉट्सॲपवरील स्टेट्स पाहून मित्र भेटण्यासाठी आला आणि घटना उघडकीस आली

औरंगाबाद : मनपसंत बायको न मिळाल्यामुळे नाराज राहणाऱ्या नवविवाहित तरुणाने व्हॉट्सॲपवर ‘आय क्वीट’ असे स्टेट्स ठेवून आत्महत्या केली. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे रविवारी रात्री घडली.

अजय समाधान साबळे (२५) असे मृताचे नाव आहे. तो राजनगर येथे आई-वडील, पत्नीसोबत राहत होता. प्लंबरचे काम करणाऱ्या अजयचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जेवण केल्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला. काही वेळात त्याचा मित्र त्याचे व्हॉट्सॲपवरील स्टेट्स पाहून त्याला भेटण्यासाठी आला. तो त्याच्या खोलीत गेला तेव्हा अजयने गळफास घेतलेला दिसला. घटनेची माहिती तत्काळ मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी अजयला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लग्न झाल्यापासून राहत होता नाराजपोलीस सूत्रांनी सांगितले की, अजय लग्नानंतर नाराज होता. तेव्हापासून तो समाजमाध्यमावरील त्याच्या अकाउंटला नेहमी निराशाजनक विचार असलेले स्टेट्स ठेवत होता. त्याच्या मित्रांनी त्याला अनेकदा विचारले; मात्र तो उत्तर देत नव्हता.

सुसाईड नोट पोलिसांच्या हातीमुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितले की, मृताच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तेथेही ती जेवणानंतर स्वत:च्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते. या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी