शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

मनपात कर्मचारी भरती का नाही?; अनुसूचित जाती समितीने प्रशासनाला तासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 7:12 PM

बिंदू नामावलीनुसार ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी सूचना बुधवारी विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने महापालिका प्रशासनाला केली. 

ठळक मुद्देमहापालिकेत २०११ पासून कर्मचारी भरतीच करण्यात आलेली नाही.

औरंगाबाद : महापालिकेत २०११ पासून कर्मचारी भरतीच करण्यात आलेली नाही. शेकडो मंजूर पदे कशासाठी रिक्त ठेवण्यात आली आहेत. बिंदू नामावलीनुसार ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी सूचना बुधवारी विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने महापालिका प्रशासनाला केली. 

महापालिकेच्या भोंगळ कारभारावरही समितीने जोरदार ताशेरे ओढले. अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी समिती महापालिकेत दाखल झाली. समितीचे स्वागत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केले. स्थायी समितीच्या सभागृहात रात्री ८ वाजेपर्यंत बैठक सुरू होती.

बैठकीत समितीने अत्यंत बारकाईने महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. आस्थापना विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. २०११ पासून मनपा प्रशासनाने मंजूर रिक्त पदे भरली नाहीत. यामागे नेमके कारण काय, या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आदी अनेक मुद्यांवर प्रशासनाची चांगलीच गोची झाली होती.

अधिकाऱ्यांच्या उत्तरात विरोधाभास पडेगावातील चिनार गार्डन भागातील रस्ता मागील २५ वर्षांमध्ये का विकसित झाला नाही, असा प्रश्न समितीने एका तक्रारीवरून केला. एका अधिकाऱ्याने या रस्त्याचे भूसंपादनच झाले नसल्याचे नमूद केले. मनपाच्याच दुसऱ्या अधिकाऱ्याने भूसंपादन झाल्याचा निर्वाळा दिला. या विरोधाभासाने समिती सदस्य अधिक आक्रमक झाले. प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, या भागात मी  राहत होतो. मला माहीत आहे, भूसंपादन झाले आहे. हा रस्ता त्वरित विकसित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार