शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
5
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
6
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
7
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
8
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
9
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
11
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
12
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
13
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
14
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
16
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
17
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
18
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
19
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
20
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:48 IST

एवढ नालायक सरकार अजून बघितल नाही! मनोज जरांगे पाटील यांचा संताप अनावर

वडीगोद्री (जालना): मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर 'घातपाताचा कट रचल्या'चा गंभीर आरोप करत, या प्रकरणात राजकारण केल्याबद्दल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पुन्हा एकदा ठामपणे केला असून, या संपूर्ण प्रकरणावरून सरकारवरील आपला विश्वास उडाल्याचे स्पष्ट केले.

सोमवारी अंतरवाली सराटी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. "माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, ती घटना सत्य आहे," असे जरांगे पाटील म्हणाले. "माझा घातपात धनंजय मुंडे यांनी घडवून आणला होता. मी असल्या हिजडे चाळे करणाऱ्याला मोजत नाही," अशा अत्यंत कठोर शब्दांत त्यांनी मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.

अजित पवारांसमोर लोटांगण"त्याने तिथे जाऊन अजित पवारांना सांगितलं, मी जो जरांगे पाटलांचा घातपाताचा प्रयत्न केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा. मी जर चौकशीला गेलो, तर माझ्या लोकांना मराठ्यांची लोकं मारतील. तेव्हापासून तो फरार आहे. मला वाचवा म्हणून अजितदादांच्या पायावर लोटांगण घेतोय," अशी जहरी टीका जरांगे यांनी केली.

फडणवीसांवर राजकारण केल्याचा आरोपजरांगे यांनी या प्रकरणाला संरक्षण दिल्याबद्दल थेट फडणवीस यांना लक्ष्य केले. जरांगे पाटील म्हणाले, " वर्षा बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जणू, २४ तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला. फडणवीस साहेब, तुम्ही यात राजकारण करायला नको होतं. धनंजय मुंडे यांच्या पापामध्ये तुम्ही का सहभागी होत आहात?"

सरकारवर अविश्वास"धनंजय मुंडेने माझ्या घातपाताचा प्रयत्न केला त्याला चौकशीला बोलवायला पाहिजे होतं, अटक करायला पाहिजे होती. का नाही केली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "आमचा आता सरकारवरचा विश्वास उडाला आहे, एवढा नालायक सरकार आम्ही अजून बघितलं नाही." जरांगे यांनी धनंजय मुंडेंना "बेट्या, तू माझ्या नादी लागला एवढं ध्यानात ठेव" असा थेट इशारा दिला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना यातून 'सूट' दिल्याची टीका केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Patil Accuses Fadnavis of Aiding Munde in Conspiracy

Web Summary : Manoj Jarange Patil accuses Dhananjay Munde of plotting an attack and questions Fadnavis's involvement. He alleges Munde sought protection from Ajit Pawar and expresses distrust in the government, accusing them of shielding Munde. He directly threatens Munde with consequences.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस