शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का काढले नाही? अंबादास दानवेंचा सवाल

By बापू सोळुंके | Updated: February 4, 2024 18:06 IST

समाजात द्वेष पसरविण्याचे काम भूजबळ करीत आहे.

बापू सोळुंके' छत्रपती संभाजीनगर:कल्याणमध्ये राजकीय स्पर्धेतून थेट पोलीस ठाण्यातच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली. या घटनेने महाराष्ट्राला बिहारची उपमा लोक देत असल्याने राज्याची बदनामी झाली आहे.  जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भाजप ने आमदाराला पक्षातून का काढले नाही, असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, भाजप हा पक्ष नेहमी साधनसुचीतेच्या गप्पा मारतो. देशात रामराज्य आल्याचे त्यांचे लहान, मोठे नेते सांगतात. हेच का तुमचे रामराज्य असा खोचक सवालही त्यांनी केला. पोलीस ठाण्यात भाजपचाच आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाचा पदाधिकारी महेश गायकवाडवर गोळीबार करतो. या घटनेतील महेश गायकवाड हे धुतल्या तांदळासारखे आहे असे आम्ही म्हणत नाही. पण या घटनेचा आम्ही निषेध करतो. कारण या घटनेने महाराष्ट्राची देशात बदनामी झाली आहे.

मंत्री छगन भूजबळ यांनी कालच्या सभेत विष ओकले आहे. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. खरे तर हे सरकार मराठा आरक्षण आणि ओबीसीसंदर्भात तु मारल्या सारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असे करत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात लोकसभा मतदार संघनिहाय दौरा करीत आहे. त्यांच्या दौऱ्याच धसका भाजप आणि शिंदे गटाने संताजी, धनाजीसारखा घेतला आहे. यामुळे छोट्या पदाधिकाऱ्यांपासून मोठे नेते सतत ठाकरेंवर टीका करीत असतात,असे आ. दानवे म्हणाले.

समाजात द्वेष पसरविण्याचे काम भूजबळ करीत आहेभूजबळ यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी काल नाभिक समाजाविषयी केलेेल्या वक्तव्य हे राज्यात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अठरापगड समाज आणि अन्य समाजामध्ये भांडण लावण्यासारखे आहे. तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी एखाद्या समाजाला ओढू नका, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम ते करत आहे. भूजबळासंदर्भात उपमुख्यमंत्री अजीत पवार मूग गिळून गप्प का आहे, असा आमचा सवाल आहे.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणFiringगोळीबार