शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त गावांतील शाळा बंद का ? गावकरी, शिक्षक, तज्ज्ञांनी केली सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 19:36 IST

गावकरीही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेत असताना मुलांची शाळा बंद ठेवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय जरा शिथिल करायला पाहिजे.

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दिलेल्या नव्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी रविवारी दिले. त्यावर पालकांसह शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शाळेचा निर्णय गावपातळीवर घेऊ द्या, अशी मागणी कोरोनामुक्त गावांतून होत आहे.

सोयगाव तालुक्यातील निंबायतीचे सरपंच विशाल गिरी म्हणाले, मुख्य रस्त्यापासून २ किलोमीटर आतमध्ये माझे ५ तांड्यांचे गाव आहे. बसही न येणाऱ्या पाचही तांड्यांवर शाळा आहे. १०० टक्के लसीकरण झालेले असून, गावात एकही कोरोना बाधित नाही. गावकरीही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेत असताना मुलांची शाळा बंद ठेवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय जरा शिथिल करायला पाहिजे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा मिळावी.

बहुतांश मुलांच्या पालकांकडे मोबाइल नाही. अनेकांकडे साधे फिचर फोन असून, ॲन्ड्रॉइड फोन नाहीत. मुलांचा अध्ययनस्तर खालावला आहे. हे नुकसान कसे भरून काढणार, याचाही विचार व्हायला पाहिजे. असे शिक्षक कैलास गायकवाड म्हणाले. सोमवारी पहिल्या दिवशी २० टक्क्यांपेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासला प्रतिसाद दिल्याचे शिक्षकांनी ‘लाेकमत’ला सांगितले. ऑनलाईनची साधने नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होईपर्यंत शैक्षणिक नुकसानच होईल, असे शिक्षक संघाचे राजेश हिवाळे म्हणाले.

सरसकट शाळा बंदचा निर्णय दुर्दैवीविद्यार्थी शाळेत स्थिरावले असताना हा निर्णय दुर्दैवी आहे. गावपातळीवर पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत, शालेय समिती, शाळा यांना निर्णयाचा अधिकार द्यायला हवा. एकीकडे दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात, तर दुसरीकडे ऑनलाईनच्या शिक्षणाबाबत चिंता वाटते.- अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, गणोरी

ऑनलाईन शिक्षणाला मर्यादाजिल्हा परिषदेच्या निम्म्या शाळा या द्विशिक्षकी शाळा व ५० पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. या शाळेत शारीरिक अंतर राखण्याचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. ग्रामीण भागातील मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाला खूप मर्यादा, अडचणी आहेत. ज्या गावात रुग्ण नाही, त्या गावात शाळा सुरू ठेवायला हवी. दोन वर्षांपासून मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवतो आहोत.-डाॅ. रूपेश मोरे, शिक्षणतज्ज्ञ, औरंगाबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीSchoolशाळा