चण्याच्या गोणीत कोणाचे गहू़़?

By Admin | Updated: December 23, 2014 00:08 IST2014-12-23T00:08:20+5:302014-12-23T00:08:20+5:30

उदगीर : उदगीरच्या पुरवठा विभागाचा गुंता साक्षात ब्रम्हदेवालाही सुटणार नाही़ रेशन कार्डाचा घोळ, याद्यांचा घोळ, वितरण व्यवस्थेचा महाघोळ सुरु असतानाच

Whose wheat is in the granite? | चण्याच्या गोणीत कोणाचे गहू़़?

चण्याच्या गोणीत कोणाचे गहू़़?


उदगीर : उदगीरच्या पुरवठा विभागाचा गुंता साक्षात ब्रम्हदेवालाही सुटणार नाही़ रेशन कार्डाचा घोळ, याद्यांचा घोळ, वितरण व्यवस्थेचा महाघोळ सुरु असतानाच आता एका गव्हाच्या ट्रकने पुन्हा या विभागाकडे संशयाची सुई वळली आहे़ उदगीरहून कर्नाटकात चाललेला हा ट्रक देवणी पोलिसांनी पकडला खरा मात्र त्याचे गौडबंगाल आठवडाभरानंतरही उलगडले नाही़ चन्याच्या गोणीतून गव्हाची वाहतूक होत असल्याने संशय बळावला आहे़
देवणी पोलिसांनी तोगरी मोड येथे लावलेल्या चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात एका ट्रकची तपासणी केली़ उदगीरहून कर्नाटकाच्या दिशेने निघालेल्या या ट्रकमध्ये गव्हाचा साठा होता़ परंतु, ओळखू येऊ नये, यासाठी हा गहू चन्याचे लेबल असलेल्या गोण्यांत भरला होता़ प्रथमदर्शनी या गोण्यांत चणे भरले असावेत, असे भासविण्यात आले होते़ मात्र, पोलिसांनी कसून चौकशी व तपासणी केली असता चन्याच्या गोण्यांत गहू असल्याचे आढळून आले़ हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी गव्हाच्या गोण्यांनी भरलेला हा ट्रक ताब्यात घेऊन ठाण्यात लावला़ हा गहू रेशनचा की व्यापाऱ्याचा याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ महसूल विभागास पत्र दिले़ हे पत्र मिळाल्यानंतर उदगीरचे नायब तहसीलदार बालाजी चितळे यांनी देवणीचे पोलिस ठाणे गाठून गव्हाची तपासणी केली़ पोलिसांनी ताब्यात घेतलेला गहू व उदगीरच्या पुरवठा विभागाच्या गोदामातील गव्हाचे नमुने घेऊन चितळे यांनी ते तपासणीसाठी परभणीच्या कृषी विद्यापीठाकडे पाठविले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे़ (वार्ताहर)४
उदगीरच्या पुरवठा विभागातील वितरण व्यवस्थेतील त्रुटी, ताब्यातील ट्रक उदगीरमधून निघाला होता, या बाबी लक्षात घेता संशयाची सुई उदगीरकडेच वळते आहे़ यापूर्वीही कर्नाटक व आंध्रप्रदेशात जाताना रेशनचे गहू पकडले गेल्याची उदाहरणे समोर असल्याने या संशयाला पुष्टी मिळत आहे़ ४
देवणी पोलिसांनी उभारलेल्या चेकपोस्टवर तपासणी करीत असताना हा ट्रक आढळून आला़ तपासणी दरम्यान, आतील गहू रेशनचा असल्याचा संशय बळावल्याने तो ताब्यात घेण्यात आला आहे़ महसूल विभागाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल, असे देवणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही़एम़ केंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Whose wheat is in the granite?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.