औषध दुकान कोणाचे? प्रत्यक्षात चालवितो कोण? वर्षभरात ५११ मेडिकल्सची तपासणी
By साहेबराव हिवराळे | Updated: February 8, 2024 19:21 IST2024-02-08T19:21:40+5:302024-02-08T19:21:50+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सचे परवाने देण्यात आलेले आहेत.

औषध दुकान कोणाचे? प्रत्यक्षात चालवितो कोण? वर्षभरात ५११ मेडिकल्सची तपासणी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात ५११ मेडिकल्सची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात केली. त्यातून चार लायसन्स रद्द केले. ७१ परवाने निलंबित केले. बटन नशेच्या गोळ्या, तसेच इतर कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्स
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सचे परवाने देण्यात आलेले आहेत. त्यात तालुक्यानुसार नियमित तपासणी करण्याचा भाग हा एफडीए विभागाचा असतो. त्यात गैर काही आढळल्यास त्यास नोटीस दिली जाते किंवा त्याच्या त्रुटीनुसार दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येते.
वर्षभरात दोन हजार मेडिकल्सची तपासणी
गत वर्षभरात ५११ मेडिकल्सवर इन्पेक्शन एफडीएच्या पथकांने तपासणी केली असून, त्यानुसार जो दोषी आढळला असल्यास त्यास कारवाईस सामोरे जावे लागते. वर्षभरात पथकाने तपासणी नियमितप्रमाणे करण्यात आलेली आहे. खेड्यात तालुकास्तरावर असलेल्या मेडिकलवर दवा गोळ्या घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा गोळ्या घेण्यासाठी अखेर शहरात मेडिकल गाठण्याशिवाय पर्याय नसतो.
चार मेडिकल्सचा परवाना रद्द
वारंवार दोषी आढळलेल्या मेडिकलला सूचना देऊनही ते मेडिकल चालक नियमांची पायमल्ली करीत असेल तर अखेर त्या दुकानचालकांना दोषी धरून परवाना रद्द करण्याशिवाय पर्याय नसतो. शहरात असे चार परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. सूचना देऊनही त्या गोष्टीचे पालन होत नसल्याने अखेर कारवाईशिवाय पर्यायदेखील राहत नाही.
परवाना एकाचा, चालवितो दुसराच
अनेक दुकानात परवाना चालक हा वेगळाच असून, मात्र त्या ठिकाणी दुकान चालविणारा ही व्यक्ती मात्र दुसरीच असल्याचे हे निदर्शनास आलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजीच्या दृष्टीने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
गैरप्रकार आढळ्यास कारवाई निश्चित होणारच...
नागरिकांच्या जीवन मरणाशी कोणी खेळत असेल तर त्याकडे लक्ष देऊन कारवाई करावीच लागते. त्याशिवाय तो कायद्याचे पालन करीत नाहीत. प्रथम त्या व्यक्तीला समजावून सांगूनही चुका करीत असेल तर त्यास कारवाईला सामोरे जावेच लागेल.
- बळिराम मरेवाड, अन्न व औषध प्रशासन अधिकारी.