शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

महापोर्टलमध्ये कोणाची भागीदारी, भ्रष्टाचारात कोणाकोणाला जातो वाटा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:00 IST

सरकारने बेरोजगार युवकांची चेष्टा केली.

ठळक मुद्देदिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

औरंगाबाद : महापोर्टलद्वारे नोकर भरतीमध्ये घोटाळ्याचे प्रकार होत असूनही सरकारचा याद्वारे भरती करण्याच्या अट्टहास का. यातील भ्रष्टाचाराच्या वाटण्या कोणाकोणापर्यंत जातात. यात भागीदारी कोणाची आहे हे जाहीर करा असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. तसेच महापोर्टल बंद करून सर्व भरती एमपीएससीद्वारे सुरु करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ते क्रांती चौक येथील शेतकरी आक्रोश मोर्चात बोलत होते.

मेगा पोलीस भरती झाली पाहिजे, महापोर्टल ऑनलाईन परीक्षा रद्द झाली पाहिजे, महापोर्टल बंद करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे  सोमवारी क्रांती चौक येथून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, राज्यात पोलिसांची हजारो पदे रिक्त असूनही सरकार कमी प्रमाणात भरती करत आहे. काही जिल्ह्यात एक, दोन तर काही जिल्ह्यात काहीच पदांची भरती नाही अशा प्रकारे सरकारने बेरोजगार युवकांची चेष्टाच केली आहे. हजारो पदे रिक्त असताना सरकार मेगा भरती का काढत नाही असा सवाल शेट्टी यांनी केला. तसेच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने पिडीत आहे  तर काही भागात आलेल्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. या अस्मानी संकटावर दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याची खरमरीत टीकाही यावेळी शेट्टी यांनी केली. 

दादागिरी सहन केली जाणार नाही नुसत्या घोषणा देऊन मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा प्रश्न दुसरीकडे वळवत आहेत. तसेच शेतकरी, बेरोजगारी यावर जो प्रश्न विचारतो त्याचा आवाज दडपण्यात येतो. युवती आघाडीच्या प्रदेक्षाध्यक्ष पूजा मोरे यांना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली ती लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांना संताप देणारी आहे. अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMorchaमोर्चाState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीStudentविद्यार्थी