शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘धनुष्यबाण’ व पक्ष अधिकृतपणे कोणाचा? जाणून घ्या ज्येष्ठ विधिज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:33 IST

बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार आहेत.

औरंगाबाद : धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्ष अधिकृतपणे कोणाकडे राहील, याबाबत राष्ट्रीय निवडणूक आयोगच १९६८ च्या निवडणूक चिन्ह अधिनियमानुसार निर्णय घेऊ शकतो, असे कायदेशीर मत उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले.

बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार आहेत. त्यामुळे ते ‘धनुष्यबाणा’सह संपूर्ण शिवसेनाच कायदेशीरपणे ताब्यात घेऊ शकतात, अशी चिन्हे आहेत. विद्यमान परिस्थितीत कायदा काय म्हणतो, याबाबत ‘लोकमत’ने वकिलांकडून प्रतिक्रिया घेतल्या.

निवडणूक चिन्ह गोठवले सुद्धा जाऊ शकतेजर दोन गट एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्ष किंवा त्याच्या चिन्हावर दावा सांगत असतील तर त्यावर निवडणूक चिन्ह नियम १९६८ च्या नियम १५ अन्वये निर्णय घेण्याचे अधिकार भारत निर्वाचन आयोगाचे आहेत. संबंधितांची सुनावणी घेऊन भारत निर्वाचन आयोग एक तर एखाद्या गटाचा दावा मान्य करते किंवा निवडणूक चिन्ह गोठवूसुद्धा शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा अथवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा नेता प्राप्त राजकीय पक्ष अथवा पक्षाचे चिन्ह यासंदर्भातील वाद आता भारत निर्वाचन आयोगच सोडवू शकते.-ॲड. देवदत्त पी. पालोदकर

चिन्ह ताब्यात घेऊ शकतात ‘धनुष्यबाणा’सह संपूर्ण शिवसेनाच कायदेशीरपणे ताब्यात घेऊ शकतात, असा दावा कोणी करीत असेल तर त्यांना निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. आयोग दोन्ही गटांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन योग्य तो निर्णय घेईल. शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जादा आमदार असल्यामुळे त्यांना पक्षांतर बंदीचे भय उरलेले नाही. त्यांनी पक्ष सोडलेला नाही. केवळ त्यांचा बंडखोर गट आहे.- ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख

ज्यांच्या नावे नोंदणी, त्यांचा पक्ष शिवसेना हा राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे पक्षाची ज्यांच्या नावे नोंदणी झाली असेल, त्यांच्याकडेच तो पक्ष राहील. बंडखोर विधानसभेत वरीलप्रमाणे दावा करू शकतात. मात्र, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता कमी आहे.-ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ

विधानसभेच्या सभापतींचा निर्णय महत्वाचाबंडखोर गटाला सर्वप्रथम विधानसभेच्या सभापतींकडे अर्ज करून ‘गट मान्यता’ मिळण्याची मागणी करावी लागेल. सभापती गटातील आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची खात्री करून गट म्हणून मान्यता देतात. सभापतींच्या निर्णयाचा संदर्भ देत निवडणूक आयोगच चिन्ह व पक्ष कोणाकडे राहील, याचा निर्णय घेऊ शकतात.-ॲड. बी.एल. सगर किल्लारीकर

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ