शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शहर होणार ‘वाय फाय’

By admin | Updated: October 8, 2014 01:06 IST

औरंगाबाद : इंटरनेटच्या युगात सध्या ‘वाय फाय’ झोन अर्थात वायरलेस फिडेलिटीला खूपच महत्त्व आले आहे.

औरंगाबाद : इंटरनेटच्या युगात सध्या ‘वाय फाय’ झोन अर्थात वायरलेस फिडेलिटीला खूपच महत्त्व आले आहे. इंटरनेट कनेक्शन ही आता प्रत्येक माणसाची गरज बनली असताना पूर्ण शहरच जर वाय फाय झोनमध्ये परिवर्तीत झाले तर अनेक गोष्टी सुलभ होणार आहेत. डीएमआयसीमुळे उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण होणारे संपूर्ण शहर ‘वाय फाय’ करण्याचा संकल्प औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.औरंगाबाद शहर हे देशातील एक स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. तुम्ही बीबी का मकबरा भागात असाल किंवा चिकलठाण्याच्या उद्यमनगरीत, रेल्वेस्टेशनवर असाल किंवा सिडकोच्या टाऊन सेंटरमध्ये, एखाद्या शैक्षणिक कॅम्पसमध्ये किंवा व्यापार- उद्योगात बिझी असाल. ‘वाय फाय शहरा’मुळे तुमच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीत भरच पडणार आहे. उद्योग, सेवा, शिक्षण, शासकीय, तसेच खाजगी क्षेत्रासह सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. ‘वाय फाय शहरा’त तुम्ही तुमचे स्मार्टफोन, लॅपटॉप, नेटबुक, टॅब्लेटस् आणि इतर मोबाईल डिव्हायसेस इंटरनेटशी सहजतेने कनेक्ट करू शकणार आहात. आपले शहर जगाच्या बरोबरीने चालावे, हे शहर आधुनिक बनावे याचा ध्यास घेतलेल्या राजेंद्र दर्डा यांनी ‘वाय फाय औरंगाबाद’ हा संकल्प जाहीर केला आहे. ‘वाय फाय औरंगाबाद’ जगाशी वेगवान पद्धतीने जोडले जाणार असल्याने त्याचा फायदा स्मार्टफोनधारकांंना, लॅपटॉप, नेटबुक, टॅब्लेटस् युजर्सना होणार आहे. शहराच्या दृष्टीने विचार केल्यास विविध प्रकारच्या सेवा उत्पादकतेमध्ये भर पडणार आहे. नागरी सेवा वेगाने पुरविण्यास मदत, शहराच्या नियोजन आणि योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग या दृष्टीने फायदे होणार आहेत. नागरिकांच्या दृष्टीने विचार केल्यास शहरामधील विविध सेवांशी आणि इंटरनेटशी त्यांना तात्काळ आणि वेगाने जुळता येणार आहे. वाहतूक सुरळीत होणे किंवा करणे, पार्किंगची समस्या, शिवाय टुरिझमच्या क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनस्थळासंबंधीची माहिती मिळणे, अशा प्रकारचे विविध फायदे मिळणार आहेत.जगाच्या बरोबरीने चालावे म्हणूनआज इंटरनेट हे मनुष्याच्या जगण्यातील एक महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळेच जगात अनेक शहरे आणि आपल्या देशात काही शहरे ‘वाय फाय’ झाली आहेत. माझे शहरही जगाच्या बरोबरीने चालावे, असे मला वाटते. या शहरातील नागरिकाला आधुनिकतेचे सर्व फायदे मिळायला हवेत, असे मला वाटते. त्या दृष्टीनेच मी ‘वाय फाय शहर’ करण्याचा संकल्प केला आहे. -राजेंद्र दर्डा