कोण बनणार घाटीचे कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:13+5:302021-09-23T04:06:13+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजे घाटी रुग्णालयातील प्रमुख डाॅक्टर ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर घाटीचे ...

कोण बनणार घाटीचे कारभारी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजे घाटी रुग्णालयातील प्रमुख डाॅक्टर ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर घाटीचे कारभारी म्हणून कोणत्या डाॅक्टरांच्या खांद्यावर धुरा येणार की, सध्याच्या प्रमुखांनाच मुदतवाढ मिळणार, याविषयी घाटी रुग्णालयात चांगलीच कुजबूज सुरू आहे. एकाच वेळी दोन जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराचा अनुभव असलेले ‘शिवाजी द बाॅस’ येणार की, सध्या घाटीतच ‘श्रीनिवास’ करणारे डाॅक्टर कारभारी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. लातूरमध्ये काही दिवसांपूर्वीच कारभार पाहून परतलेल्या डाॅक्टरांच्या नावाचीही कुजबूज सुरू आहे. परंतु त्यांच्या कामाच्या ‘डोई’पुढे कारभारी होण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांची ‘बळे’ कमी पडत असल्याचीही चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ, अनुभवी की नवीन डाॅक्टरांच्या चर्चेत ‘वर्षा’देखील होण्याची चिन्हे आहेत. या सगळ्यात सध्याच्या कारभारींनाच मुदतवाढ मिळेल आणि पुन्हा एकदा ते सर्वाचे ‘कान’ धरतील, अशीही कुजबूज सुरू आहे.