‘त्या’ कामांना शिफारस कोणाची ?
By Admin | Updated: July 5, 2014 00:38 IST2014-07-05T00:10:54+5:302014-07-05T00:38:20+5:30
चेतन धनुरे, लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात झालेल्या रस्ते कामाचे गौडबंगाल लवकरच समोर आणण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे़ परंतु, ज्या ६२ रस्ते कामांवर संशय आहे,

‘त्या’ कामांना शिफारस कोणाची ?
चेतन धनुरे, लातूर
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात झालेल्या रस्ते कामाचे गौडबंगाल लवकरच समोर आणण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे़ परंतु, ज्या ६२ रस्ते कामांवर संशय आहे, त्या कामांना कोणाचे शिफारसपत्र जोडले गेले, ही माहितीही समोर येणे गरजेचे आहे़
एसआरएफ निधीअंतर्गत जिल्ह्यात जवळपास १४ कोटी ८७ लाख रुपये खर्ची घातले गेले आहेत़ त्यातून १६० कामे होऊन त्याची बिलेही अदा केली गेल्याची लेखी माहिती वित्त विभागाने दिली असताना बांधकाम विभागाने मात्र १०८ कामांचाच उल्लेख केला आहे़ या रस्तेकामांपैकी ६९ रस्त्यांना त्या-त्या मतदारसंघातील सदस्यांनी शिफारस केलेली आहे़ उर्वरीत ३८ कामांपैकी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी २० ला० ५० हजार रुपयांच्या रस्तेकामाची शिफारस केली आहे़ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्येकी १५ लाख रुपयांची दोन कामे शिफारस केली आहेत़ आमदार अमित देशमुख यांनी १५ लाख रुपयांचे एक तर आमदार वैजनाथ शिंदे यांनी १० लाख रुपयांच्या एका कामास शिफारस केली असल्याचेही अहवालात नमूद आहे़ आमदार बाबासाहेब पाटील यांनी ३१ तर आमदार दिलीपराव देशमुख यांनी २५ लाखांची प्रत्येकी दोन कामांना शिफारस केली आहे़ बांधकाम समिती सदस्यांनी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या ९ कामांना शिफारस केली आहे़ तर अध्यक्ष व बांधकाम सभापती कल्याण पाटील यांनी संयुक्तरित्या २१ कामांसाठी शिफारस केली आहे़ या १०८ कामांत सर्व निधी खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे़ परंतु, वित्त विभागाने बिले काढलेल्या इतर ६२ कामांना कोणाची शिफारस होती, हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे़ लोकप्रतिनिधींनी खरोखर शिफारसपत्रे दिली होती की खोटी शिफारसपत्रे जोडून या कामांचा गोलमाल करण्यात आला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे़ अशी चौकशी झाल्यास या घोळामागे दडलेले सगळेच मोहरे समोर येतील़ ही नावे कधी अध्यक्ष व सभापती कधी जाहीर करतात, याकडे लक्ष लागले आहे़