शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगराचा महापाैर कोण? भाजपमध्ये स्पर्धा जोरात; राजूरकर, औताडे, वानखेडे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:50 IST

आरक्षण जाहीर होताच भाजपमध्ये वेगवान घडामोडींना सुरुवात झाली.

छत्रपती संभाजीनगर : शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौरपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत गुरुवारी महापौर सोडतीचे आरक्षण काढण्यात आले. त्यात छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद खुले (सर्वसाधारण) आहे. आरक्षण जाहीर होताच भाजपमध्ये वेगवान घडामोडींना सुरुवात झाली. दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले समर्थनगर प्रभागाचे समीर राजूरकर, मयुरपार्क प्रभागाचे विजय औताडे आणि तिसऱ्यांदा निवडून आलेले एन-११-रोजबाग प्रभागाचे राजगौरव वानखेडे या पदासाठी स्पर्धेत आहेत.

महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ५७ उमेदवार निवडून आले. बहुमतासाठी भाजपला ५८ मतांची गरज आहे. विभागीय आयुक्तांकडे गट स्थापन करताना यामध्ये आणखी किती नगरसेवक भाजपसोबत येतात, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला मतदारांनी बहुमताजवळ नेऊन ठेवले आहे. यापूर्वीच्या सहा निवडणुकांमध्ये त्रिशंकू अवस्था राहिली. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी महापालिका प्रशासन विभागीय आयुक्तांना पत्र पाठविणार आहे. विभागीय आयुक्त पीठासन अधिकाऱ्यांची नेमणूक करतील. त्यानंतर महापालिका प्रशासन निवडणूक कार्यक्रम निश्चित करणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर निवडणुकीसाठी सभा घेण्यात येईल, अशी माहिती मनपातील सुत्रांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद सोडतीत खुले (सर्वसाधारण) आहे. दुपारी १२:४५ वाजता आरक्षणाची घोषणा होताच शहरात इच्छुकांनी एकच जल्लोष केला. भाजपमध्ये इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली.

सर्वसाधारण प्रवर्गातील यापूर्वीचे महापौरगजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).

महापालिकेतील पक्षीय बलाबलभाजप - ५७एमआयएम - ३३शिंदेसेना - १३उद्धवसेना - ६वंचित बहुजन आघाडी - ०४राष्ट्रवादी (शरद पवार) - ०१काँग्रेस - ०१एकूण- ११५

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Mayor Race Heats Up; BJP Candidates in Focus

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's mayor post is open. BJP's Rajurkar, Autade, and Wankhede are key contenders after BJP secured 57 seats in the municipal elections, needing one more for a majority. The election is expected in the second week of February.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर