शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

‘टोर्इंग’ ठरला मनपासाठी पांढरा हत्ती !

By admin | Updated: May 13, 2014 01:08 IST

आशपाक पठाण , लातूर महानगरपालिकेकडून शहर वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या टोर्इंग वाहनाचा खर्च वार्षिक ८ लाखांपेक्षा अधिक आहे़

आशपाक पठाण , लातूर महानगरपालिकेकडून शहर वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या टोर्इंग वाहनाचा खर्च वार्षिक ८ लाखांपेक्षा अधिक आहे़ खर्चाच्या तुलनेत मनपाला मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने मनपा प्रशासनाने यंदा टोर्इंग वाहन बंद केले आहे़ विशेष म्हणजे, दोन वर्ष चालविलेल्या वाहनाचे वर्षभराचे भाडे थकित असल्याचे समोर आले आहे़ वाहतूक शाखेने केलेल्या दंडात्मक कारवाईतून वसूल केलेल्या रकमेपैकी केवळ ७ हजार ५०० रूपये मनपाला दिले आहेत़ उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढत चालल्याने सदरील वाहन बंद करण्यात आले आहे़ स्थानिक संस्था व पंचायतराज संस्था या उद्दिष्टाखाली स्थानिक संस्था नगरपालिका अधिनियम व इतर अधिनियमाखाली दंड रूपाने जमा झालेल्या रकमेतून ५० टक्के आस्थापना खर्च वजा करून उर्वरित ५० टक्के रक्कम मुख्य महानगर दंडाधिकारी, जिल्हा न्यायालयामार्फत संबंधित नगरपालिका, महानगरपालिकेला सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते़ लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत शहरात केलेल्या कारवाईतून जवळपास ४० लाखांवर दंड वसूल केला आहे़ मात्र, मनपाच्या तिजोरीत मात्र यातील केवळ साडेसात हजार पडले आहेत़ वाहतूक शाखेला सुविधा पुरवून मिळणार्‍या उत्पन्नात तोटा येत असल्याने वाहन बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे़ उत्पन्न कमी व खर्च अधिक या पेचात सापडलेल्या मनपाकडे कर्मचार्‍यांचेही गेल्या ५ महिन्यांपासून वेतन थकित आहे़ गेली दोन वर्ष टोर्इंग वाहन शहर वाहतूक शाखेला देण्यात आले होते़ दोेन वर्षात मनपाला ५० हजार रूपये वाहतूक शाखेकडून मिळाले आहेत़ तर यावर्षी केवळ ७ हजार ५०० रूपये मिळाल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले़ ‘टोर्इंग’चा खर्च़़़ टोर्इंग वाहनाचे भाडे, डिझेल, चालकाचे वेतन, सोबत असलेल्या मनपाच्या चार कर्मचार्‍याचे वेतन असा एकूण खर्च ८ लाखांवर जात होता़ टोर्इंग वाहनाचे वार्षिक भाडे ४ लाख ८० हजार, चालकाचा पगार १ लाख ८० हजार, या वाहनासोबत मनपाचे दोन कर्मचारी सहभागी असतात़ त्यांचा वार्षिक पगार २ लाख ४० हजारांच्या जवळपास आहे़ दरवर्षी किमान ८ ते ९ लाख रूपये खर्च करणार्‍या मनपाला वाहतूक शाखेकडून मिळणारी रक्कम तुटपुंजी असल्याने ‘टोर्इंग’चा पांढरा हत्ती पोसायचा किती दिवस यामुळेच ते वाहन बंद करण्यात आले आहे़