‘टोर्इंग’ ठरला मनपासाठी पांढरा हत्ती !
By Admin | Updated: May 13, 2014 01:08 IST2014-05-12T23:43:42+5:302014-05-13T01:08:39+5:30
आशपाक पठाण , लातूर महानगरपालिकेकडून शहर वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या टोर्इंग वाहनाचा खर्च वार्षिक ८ लाखांपेक्षा अधिक आहे़

‘टोर्इंग’ ठरला मनपासाठी पांढरा हत्ती !
आशपाक पठाण , लातूर महानगरपालिकेकडून शहर वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या टोर्इंग वाहनाचा खर्च वार्षिक ८ लाखांपेक्षा अधिक आहे़ खर्चाच्या तुलनेत मनपाला मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने मनपा प्रशासनाने यंदा टोर्इंग वाहन बंद केले आहे़ विशेष म्हणजे, दोन वर्ष चालविलेल्या वाहनाचे वर्षभराचे भाडे थकित असल्याचे समोर आले आहे़ वाहतूक शाखेने केलेल्या दंडात्मक कारवाईतून वसूल केलेल्या रकमेपैकी केवळ ७ हजार ५०० रूपये मनपाला दिले आहेत़ उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढत चालल्याने सदरील वाहन बंद करण्यात आले आहे़ स्थानिक संस्था व पंचायतराज संस्था या उद्दिष्टाखाली स्थानिक संस्था नगरपालिका अधिनियम व इतर अधिनियमाखाली दंड रूपाने जमा झालेल्या रकमेतून ५० टक्के आस्थापना खर्च वजा करून उर्वरित ५० टक्के रक्कम मुख्य महानगर दंडाधिकारी, जिल्हा न्यायालयामार्फत संबंधित नगरपालिका, महानगरपालिकेला सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते़ लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत शहरात केलेल्या कारवाईतून जवळपास ४० लाखांवर दंड वसूल केला आहे़ मात्र, मनपाच्या तिजोरीत मात्र यातील केवळ साडेसात हजार पडले आहेत़ वाहतूक शाखेला सुविधा पुरवून मिळणार्या उत्पन्नात तोटा येत असल्याने वाहन बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे़ उत्पन्न कमी व खर्च अधिक या पेचात सापडलेल्या मनपाकडे कर्मचार्यांचेही गेल्या ५ महिन्यांपासून वेतन थकित आहे़ गेली दोन वर्ष टोर्इंग वाहन शहर वाहतूक शाखेला देण्यात आले होते़ दोेन वर्षात मनपाला ५० हजार रूपये वाहतूक शाखेकडून मिळाले आहेत़ तर यावर्षी केवळ ७ हजार ५०० रूपये मिळाल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले़ ‘टोर्इंग’चा खर्च़़़ टोर्इंग वाहनाचे भाडे, डिझेल, चालकाचे वेतन, सोबत असलेल्या मनपाच्या चार कर्मचार्याचे वेतन असा एकूण खर्च ८ लाखांवर जात होता़ टोर्इंग वाहनाचे वार्षिक भाडे ४ लाख ८० हजार, चालकाचा पगार १ लाख ८० हजार, या वाहनासोबत मनपाचे दोन कर्मचारी सहभागी असतात़ त्यांचा वार्षिक पगार २ लाख ४० हजारांच्या जवळपास आहे़ दरवर्षी किमान ८ ते ९ लाख रूपये खर्च करणार्या मनपाला वाहतूक शाखेकडून मिळणारी रक्कम तुटपुंजी असल्याने ‘टोर्इंग’चा पांढरा हत्ती पोसायचा किती दिवस यामुळेच ते वाहन बंद करण्यात आले आहे़