अंघोळ करताना युवकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
By Admin | Updated: March 26, 2016 00:56 IST2016-03-26T00:20:47+5:302016-03-26T00:56:08+5:30
सिल्लोड : शहरात दिवसभर रंगपंचमी साजरी केल्यानंतर गुरुवारी दुपारी एमटीडीसी कार्यालयामागील रजालवाडी पाझर तलावावर अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अंघोळ करताना युवकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
सिल्लोड : शहरात दिवसभर रंगपंचमी साजरी केल्यानंतर गुरुवारी दुपारी एमटीडीसी कार्यालयामागील रजालवाडी पाझर तलावावर अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
किशोर (भाऊसाहेब) धनाजी बडक (वय २७, रा. पळशी, हल्ली मुक्काम जयभवानीनगर सिल्लोड) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. गुुरुवारी सकाळी धूलिवंदन साजरे केल्यांनतर दुपारी अजिंठा रस्त्यावरील रजालवाडी पाझर तलावावर मित्रांसोबत अंघोळीसाठी किशोर गेला होता.
तलावात उतरल्यांनतर त्यास तलावातील खोल पाणी आणि गाळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो अचानक पाण्यात बुडून तळाशी असलेल्या गाळात अडकला. तो दिसत नसल्यामुळे सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला, तेव्हा तो चिखलात तळाशी असल्याने तो बराच वेळ त्यांच्या नजरेस पडला नाही. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोहणाऱ्या युवकांनी त्याचा शोध घेतला आणि त्यास रुतलेल्या गाळातून बाहेर काढले.
त्यानंतर त्यास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून किशोर यास मृत झाल्याचे घोषित केले. किशोर हा सिल्लोड येथे पॅथॉलॉजी लॅब चालवायचा. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.