शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कुठे बनावट औषधी तर नाही ना? औषध प्रशासनाला जाग, सरकारी रुग्णालयांतून घेणार नमुने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:18 IST

घाटी रुग्णालयाचीही बत्ती पेटली, पुरवठा होणाऱ्या प्रत्येक औषधींची यापुढे तपासणी

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात बनावट औषधींचा प्रकार सुरू असताना ‘रिॲक्शन आली तर तपासणी, तक्रार आली तर तपासणी’ अशी भूमिका घेणाऱ्या औषध प्रशासनाला अखेर जाग आली आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांतून औषधी नमुने घेऊन बनावट औषधी आहेत की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.

आजघडीला केवळ दुकानांना परवाने देण्याचेच काम औषधी प्रशासन करीत आहे. औषधी आणि मेडिकल स्टोअर्सच्या तपासणीचे काम नावालाच सुरू आहे. त्यामुळे बनावट औषधी कशा सापडतील, असा सवाल सामान्यांतून उपस्थित होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० डिसेंबर रोजी ‘फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी शोधणार?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत औषधी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून औषधी नमुने तपासणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बनावट औषधींतील घटकांमुळे आजार बराही होत नसेल आणि औषधींचा काही दुष्परिणामही होत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी कोणाकडून काही तक्रार येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रत्येक औषधीची तपासणी होणे गरजेचे, आवश्यक असल्याचेही ‘लोकमत’ने समोर आणले. याचीही दखल घेत घाटी प्रशासनाने घेत खबरदारीचे पाऊल टाकले आहे. यापुढे पुरवठा होणाऱ्या औषधींची नमुने तपासण्याचा निर्णय घेतल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

घाटीत महिन्याला दीड कोटींची औषधीघाटी रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या ठिकाणी ‘चिठ्ठी’मुक्त उपक्रमांतर्गत रुग्णांना सर्व प्रकारची औषधी मोफत रुग्णालयात उपलब्ध करून दिली जात आहे. महिन्याकाठी दीड कोटींची औषधी लागतात.

१० कोटींची औषधी येणारघाटी रुग्णालयाला लवकरच १० कोटींची औषधी खरेदी प्रक्रिया होणार आहे. यातील प्रत्येक औषधींच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.

औषध निरीक्षकांना सूचनाजिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील औषधींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी औषधी नमुने घेण्यास औषधी निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. बुधवारपासून नमुने घेण्यास सुरुवात होईल.- राजगोपाल बजाज, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन (औषध)

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmedicineऔषधंhospitalहॉस्पिटलgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी