शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कुठं मुरतंय! अधिवेशनापूर्वीच ३०० कोटींच्या टँकर घोटाळ्याची चौकशी स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:11 IST

विधानसभेच्या मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश शासनाने दिले होते.

औरंगाबाद : मराठवाड्यात चार वर्षांत विभागात पर्जन्यमान सरासरी एक हजार मिलीमीटरच्या पुढे गेले असतानाही टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर विभागात कोट्यवधींचा खर्च झाला. यात २०१८ ते २०२२ या काळात अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपये रक्कम खर्च करण्यात आली. या खर्चावर संशय व्यक्त करीत बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अधिवेशनापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीला शासनाने स्थगिती दिल्याने संशय वाढला आहे. विभागीय आयुक्तालयाला स्थगिती आदेश प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आदेशामुळे चौकशीसाठी नियुक्त केलेल्या ४०० अधिकाऱ्यांच्या तालुकानिहाय चौकशी समित्याही स्थगित झाल्याचे मानले जात आहे. विधानसभेच्या मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश शासनाने दिले होते. शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माहिती संकलनासाठी सुमारे ४०० अधिकाऱ्यांची तालुकानिहाय नियुक्ती केली. लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, महसूल कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन टँकर कसे लावले, सुरू कधी केले, किती फेऱ्या झाल्या, याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करणार होते.

४०० अधिकाऱ्यांच्या समित्यांना स्थगितीविभागात टँकर पाणीपुरवठ्यात घोटाळा झाल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पूर्ण विभागात चौकशी करावी, असे आदेश शासनाने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यासाठी लेखाधिकारी यांच्यासह चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. यात ४०० अधिकाऱ्यांचा समावेश होता. काही लेखाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास नकार दर्शविला होता. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. दरम्यान, आता शासनानेच ही चौकशी स्थगित करण्याचा आदेश दिल्यामुळे सगळे काही थांबले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणीfraudधोकेबाजी