शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कुठंय ग्रीन कॅरिडोर ? रुग्णवाहिकेला ११ कि.मी.साठी लागली ३२ मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 6:11 PM

घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहेजालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जालना रोडवरून सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोरील वाहने कधी अचानक वळण घेतात, तर कधी वाहतूक सिग्नलमुळे ब्रेक मारावा लागतो.  सिग्नलवर वाहनचालक रस्ता देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु वाहनांच्या रांगेत तेही अशक्य होते. अशा सगळ्या अडथळ्यांना पार करत चिकलठाणा येथील  जिल्हा रुग्णालयापासून घाटीत पोहोचताना ११ कि.मी.च्या अंतरासाठी ३२ मिनिटांचा कालावधी रुग्णवाहिकेला लागतो.

शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवरील वाहतूक कोंडीच्या ब्लाॅकेजचा रुग्णवाहिकांनाही फटका बसत आहे. घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते. चिकलठाणा ते घाटी या अंतरासाठी किती वेळ लागतो आणि रुग्णवाहिका चालकांना या रस्त्यावर कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, याची ‘लोकमत’ ने पडताळणी केली.

मुंबईत लोकलमध्ये बसल्याशिवाय पर्याय नाही, तसेच औरंगाबादकरांना जालना रोडवर आल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला जालना रोडवर यावेच लागते. परंतु गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहे. प्रत्येक चौकात वाहनास  वाहतूक कोंडीत अडकावे लागते. रुग्णवाहिकेत जीवनाशी लढा देत असलेल्या रुग्णांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. अपघात, हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, ब्रेन हॅमरेज अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यांना रुग्णालयात वेळेत नेण्यासाठी रुग्णवाहिकांमधून नेले जाते, परंतु जालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. रुग्णवाहिका सहज जाऊ शकतील, यासाठी उपाययोजनांची गरज आहे,  असे चालक किरण रावल म्हणाले. 

१० चौकांतून प्रवासजिल्हा रुग्णालयासमोरून निघाल्यानंतर घाटीत पोहोचेपर्यंत १० चौक पार करावे लागले. प्रत्येक चौकात रस्त्याच्या कधी डाव्या, तर उजव्या बाजूने वळण घेणाऱ्या वाहनांमुळे रुग्णवाहिकेचा वेग कमी करावा लागला. दुचाकी, चारचाकी चालक रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु सिग्नल सोडल्याशिवाय रुग्णवाहिका पुढे जाऊच शकत नसल्याची स्थिती आहे.

संपूर्ण रस्त्यावर वाहनेसिग्नल सुटल्यानंतर सर्वात पुढे जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत वाहने उभी केली जातात. उजव्या बाजूने पुढे जायचे ठरविले तरीही समोरील वाहने गेल्याशिवाय तेदेखील अशक्य होते. रुग्णवाहिका आल्यानंतर वाहतूक माेकळी करून देण्यासाठी धावपळ उडत असल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा