शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जायकवाडीत पाणी पोहोचणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:58 IST

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले आहे.

ठळक मुद्देअवघ्या मराठवाड्याचे लक्ष : नगर, नाशिकमध्ये विरोध, मराठवाड्यात मात्र सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एका बैठकीनंतर शांत

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले आहे. परिणामी, जायकवाडीत हक्काचे पाणी कधी पोहोचणार, याकडे अवघ्या मराठवाड्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.जायकवाडी धरणासाठी दारणा, गंगापूर व पालखेड धरण समूहातील धरणांतून २६ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आंदोलनामुळे आता नाशिक जिल्ह्यातील तीनही धरण समूहातून सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले जाणार आहे. नगरमध्येही पाणी सोडण्यासाठी विरोध होत आहे. मुळा धरणातून शनिवारी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही, अशी माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात १५ आॅक्टोबर रोजी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीच्या सात दिवसांनंतर २३ आॅक्टोबर रोजी ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी, असे म्हटले होते. त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी होण्याची गरज होती. परंतु पाणी सोडण्यासाठी पूर्वतयारी आणि नंतर आंदोलनामुळे उशीर होत असल्याचे कारण नगर, नाशिक जिल्ह्यांतील पाटबंधारे विभागाचे अधिकारी पुढे करीत आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील अधिकारीही पाणी सोडण्याच्या विरोधात असल्याची ओरड होत आहे. पाणी प्रश्न पेटणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी जायकवाडीत कधी पाणी येणार, याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असणाºयांवर कारवाईची मागणी मराठवाड्यातून पुढे येत आहे.मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कुठे?नगर, नाशिकमध्ये पाणी अडविण्यासाठी आंदोलने उभी राहिली. परंतु मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी २२ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत मनोगत व्यक्त करून शांत बसले आहेत. या परिषदेनंतर आदेश निघाले, मात्र पाणी जायकवाडीत पोहोचेल, यासाठी कोणतीही भूमिका सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून घेतली जात नसल्यामुळे नाराजीचा सूर मराठवाड्यातून व्यक्त होत आहे.आदेशाचे अनुपालन नाही तर शिक्षामहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिक रण कायद्यातील क लम क्रमांक २६ या अधिनियमाखालील आदेशाचे अनुपालन न केल्यास कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यास होत असलेल्या विलंबासाठी संबंधित अधिकाºयांवर कारवाई होऊ शकते. आदेशाचे अनुपालन न केल्याबद्दल अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी गत आठवड्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केलेली आहे.निळवंडेतून आज सोडणार पाणीभंडारदरा धरणातून २५ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे पाणी प्रथम निळवंडे धरणात जमा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार निळवंडेतून जायकवाडीसाठी रविवारी पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण