शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

खड्ड्यांची रांगोळी कधी बुजवणार ? केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा रस्त्याच्या दुरुस्तीस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 1:53 PM

केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा या रोडवर खड्डे पडलेले असून रोडवरील डांबराचा थर पूर्णपणे उखडला गेला आहे

ठळक मुद्देजून २०२० पासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.आठ महिन्यांपासून प्रवासी भोगत आहेत नरकयातना

- श्रीकांत पोफळे

करमाड : औरंगाबाद - जालना महामार्गावर केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा या २ किलोमीटरच्या परिसरात पावसाळ्यापासून खड्डे पडलेले असून अद्याप देखील त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. जून २०२० पासून हा चार किमीचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून जूनपासून यावर कुठलेच दुरुस्तीचे काम झालेले नाही. मागील १० वर्षात पावसाळ्यानंतर फेब्रुवारीपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही असं कधीही घडलेल नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून याची दुरुस्ती करावी अशी मागणी औरंगाबाद तालुक्यातील नागरिक व प्रवासी करत आहे.

राज्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतातचं गेल्या आठ महिन्यापासून खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होतं आहे. महामार्गावरील​ मोठमोठ्या खड्ड्यांमुळे केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा​हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारा​मुख्यरस्ता व​ महामार्ग असूनही संबंधित विभागाचे​याकडे पूर्णपणे​दुर्लक्ष होत आहे. केम्ब्रिज चौक ते विमानतळापर्यंतचा रस्ता जून २०२० पासून जागतिक बँक प्रकल्पाकडून दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. त्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर रस्तावर खड्डे पडलेले आहे. रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. पावसाळ्यापासून या महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक वाहन चालकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागतं आहे.​ 

काही दिवसांपूर्वीचं येथे खड्डा वाचवण्याच्या नादात मोटारसायकल चालकाने​अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागुन आलेल्या कारच्या धडकेत​ एक दुचाकीस्वार गंभीर जखमी​ झाला होता. दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा​मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग मागील आठ महिन्यापासून झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप शेंद्रा एमआयडीसीत जाणारे कामगार, रोज ये-जा करणारे शिक्षक, बँक, सरकारी अधिकारी- कर्मचारी, पालक- विद्यार्थी, व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केला आहे. 

लवकरच दुरुस्ती करू या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे साईड अभियंता आशिष देवतकर यंच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की याची दुरुस्ती आम्ही लवकरच करणार आहोत. दुरुस्तीला विलंब का झाला असे विचारले असता त्यांनी सांगितले की टोलवसुली करणाऱ्यांनी दुरुस्ती करायला हवी होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने हस्तांतरीत झाल्यापासून म्हणजे जून २०२० पासून का केली नाही असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

'त्यांनीच' दुरुस्ती करावीजालना रोड दुरुस्तीची जबाबदारी ही टोलवसुली करणाऱ्या ठेकेदाराची असते त्यांनी नाही बुजवल्यास आम्ही कारवाई देखील करू शकतो. मात्र, केम्ब्रिजपासून चिकलठाणा हा ४ किमीचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. यामुळे त्यांनीच याची दुरुस्ती करावी.- वैभव जाधव, कनिष्ट अभियंता, वर्ग-२, जागतिक बँक प्रकल्प.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादAccidentअपघात