शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

अनुकंपाधारकांच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 19:07 IST

भरतीकडे डोळे लावून बसलेले अनुकंपाधारक वयाची मर्यादा ओलांडत आहेत. 

-विजय सरवदे 

शासकीय सेवेत कार्यरत असताना कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपातत्त्वावर सेवेत सामावून घेण्याची योजना आहे. एकूण रिक्त जागांच्या १० टक्के अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले जाते. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत कित्येक वर्षांपासून अशी भरती झालेलीच नाही. अशीच अवस्था अन्य शासकीय कार्यालयांमधील अनुकंपाधारकांची आहे. दिवसेंदिवस प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे भरतीकडे डोळे लावून बसलेले अनुकंपाधारक वयाची मर्यादा ओलांडत आहेत. 

वास्तविक पाहता अधिकाऱ्यांनी मनात आणले तर अनुकंपातत्त्वानुसार यापूर्वीच भरती झाली असती; पण प्रत्येक वेळी काही तरी कारण काढून भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येते. डिसेंबर २०१५ मध्ये अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षा यादीतील अवघ्या ९ जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत भरतीच झालेली नाही. दरवर्षी केवळ प्रतीक्षा यादीच अद्ययावत केली जाते. सध्या जि. प. सामान्य प्रशासन विभागाने १९२ अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी तयार केलेली आहे, असे असले तरी शासकीय धोरणानुसार प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार अवघ्या ३० ते ३५ जणांनाच नोकरीत सामावून घेतले जाऊ शकते. 

मागील डिसेंबर महिन्यात अनुकंपाधारकांंना ज्येष्ठता यादीनुसार सेवेत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याही महिन्यात भरती झाली नाही. या वर्षाच्या मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यानंतर सध्या विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. औरंगाबादशेजारील अहमदनगर जिल्हा परिषदेने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार दिला. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. औरंगाबाद जिल्हा परिषददेखील असे करूशकली असती; पण त्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वृत्ती असावी लागते. 

घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे संसार उघड्यावर पडला आहे. अनुकंपातत्त्वानुसार नोकरीची आशा असताना प्रशासन सातत्याने उमेदवारांची निराशाच करीत आहे. अनेक कुटुंबांना अक्षरश: उपासमारीचा सामना करावा लागत आहे. प्रतीक्षा यादीवर अनुकंपाधारक वयोमर्यादा ओलांडून बाद होण्याच्या सीमारेषेवर आले आहेत, तर अनेकजण यातून बादही झाले आहेत. मागील काही दिवसांपासून अस्वस्थ अनुकंपाधारकांनी सेवेत सामावून घ्यावे म्हणून जि.प. प्रशासनाला उपोषणाचा इशाराही दिला होता. तेव्हा लवकरच भरती केली जाईल, असे आश्वासन देऊन प्रशासनाने त्यांची बोळवण केली. अनुकंपाधारकांची ‘गल्ली ते दिल्ली’ स्थिती सारखीच आहे. अनुकंपाधारकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अनुकंपाधारक संघाने मुंबईत उपोषण करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न बराच गाजला; पण नंतर ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच या भरतीची स्थिती झाली. कुटुंबाचा गाडा हाकताना अनुकंपाधारक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते; परंतु त्यावरही मात करताना त्यांच्या मनात केवळ एकच आशा असते ‘आज नाही, तर उद्या नोकरीची संधी मिळेल’ व कुटुंबाची होणारी वाताहत थांबेल. मात्र, वर्षामागून वर्षे चालली तरी अनुकंपा भरतीबाबत प्रशासन हालत नाही. प्रशासनातील वरिष्ठांना तरी पाझर फुटावा व अनुकंपाधारकांचा रखडलेला हा प्रश्न मार्गी लावावा. तूर्त एवढेच!

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी