टेम्पोला वाचविताना बस दुभाजकाला धडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:01 IST2019-07-07T23:00:57+5:302019-07-07T23:01:15+5:30
अचानक आडवा आलेल्या टेम्पोला वाचविताना बस दुभाजकाला धडकली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली .

टेम्पोला वाचविताना बस दुभाजकाला धडकली
वाळूज महानगर : अचानक आडवा आलेल्या टेम्पोला वाचविताना बस दुभाजकाला धडकली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली असून, बसमधील ४० प्रवासी बचावले आहेत. ही घटना रविवारी वाळूज जवळील एका कंपनीसमोर घडली.
चालक चंद्रकांत दामोदर राख हे रविवारी पुण्यावरुन अकोलाकडे ४० प्रवासी घेऊन बसने (एमएच-१४, बीटी- ४८११) निघाले होते. वाळूज लगत अचानक टेम्पो आडवा आला. चालक राख यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे ब्रेक लागले नाही.
प्रसंगावधान राखत राख यांनी बस दुभाजकावर चढवली. यामुळे बसमधील ४० प्र्रवासी बचावले. मात्र, चालक राख हे जखमी झाले. राख यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान बसची पर्यायी व्यवस्था करुन प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.
या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नसल्याचे पोलीसांनी सांगितले.