प्रकरणाचे पुढे काय ? फायलीलाच फुटले पाय...
By Admin | Updated: November 6, 2014 00:58 IST2014-11-06T00:58:46+5:302014-11-06T00:58:46+5:30
दत्ता थोरे ,लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या पाच लाखाच्या इमारतीवर ७५ लाख खर्च करण्याच्या कारवाईला लाल फितीत दडपण्याच्या हालचाली सुरू आहेत.

प्रकरणाचे पुढे काय ? फायलीलाच फुटले पाय...
भंडारा : पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याला मागासलेपणाचा कलंक वेळोवेळी लावण्यात येतो. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आपल्या पक्षाचा एजेंडा असून शेतकऱ्यांपासून तर सामान्यांपर्यंत विकासाच्या प्रवाहात आणणे हा आमचा मुख्य हेतू आहे. भंडारा जिल्ह्याचे नाव मागासलेपणाच्या कलंकापासून मुक्त करणे हा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
राज्यात भाजपचे सरकार आरुढ झाल्यानंतर खासदार नाना पटोले यांची भंडारा येथील विश्रामगृहात प्रथमच पत्र परिषद झाली. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे नवनिर्वाचित आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे व आ.राजेश काशिवार उपस्थित होते.
खा.पटोले म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत आमची जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्यात बहुचर्चित व तेवढेच ज्वलंत प्रश्न आ वासून उभे आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र झटणारा बळीराजाची झोळी आजही खालीच आहे. धानाला समर्थन मुल्य मिळावे यासाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस स्वीकारण्याबाबत पक्षाची भूमिका सकारात्मक आहे. धान खरेदीचा मुद्दा हाच सर्वोच्च प्राधान्य मुद्दा आहे. त्यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्यात तद्वतच जिल्ह्यातही भारनियमन होत आहे. खासगी क्षेत्रातून वीज खरेदी करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे, पुनर्वसनाच्या कामांना गती देणे यावर प्राधान्य आहे.
जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. आजही लक्षावधी तरुणांच्या हातांना काम नाही. जिल्ह्यात उद्योगांना प्राधान्य देऊन राज्य शासनातर्फे एम.आय.डी.सी. क्षेत्रात उद्योग निर्मितीवर भर देण्याचा आमचा मानस आहे. त्यातच शेतीवर आधारित उद्योग स्थापित व्हावे अशी चाचपणी सुरु आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटणार नाही. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता सकारात्मक ठेवून विकासकार्याला प्राधान्य द्यावे असेही नाना पटोले यांनी सांगितले.
तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा हे गाव खासदार योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले आहे. तसेच सी.एस.आर. योजनेअंतर्गत तुमसर तालुक्यातील बारा गावांचा विकास केला जाणार आहे. त्या अंतर्गत शंभर कोटींचा खर्च केला जाणार आहे. या बारा गावात शिक्षण आरोग्य, रोजगार यावर विकासकार्य केली जाणार आहेत. मार्च २०१५ नंतर टप्प्याटप्प्याने या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अन्य गावांचा समावेश केला जाणार आहे. नाग नदीच्या पाण्याचे शुद्धीकरणासंदर्भात कामही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही खा.पटोले यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, जि.प. सदस्य भरत खंडाईत, होमराज कापगते, सुर्यकांत इलमे, मुकेश थानथराटे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)