मनपा आयुक्तपदी आता कोण येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:41 IST2018-04-17T01:40:40+5:302018-04-17T01:41:08+5:30
सोमवारी राज्यातील २५ पेक्षा अधिक आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही.

मनपा आयुक्तपदी आता कोण येणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर असतानाही राज्य शासन महापालिकेला स्वतंत्र आयुक्त देण्यास तयार नाही. सोमवारी राज्यातील २५ पेक्षा अधिक आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले. महापालिकेत महिला आयुक्ताची नेमणूक केल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगलेली असताना सायंकाळपर्यंत मनपाला यासंदर्भात कोणतेच आदेश प्राप्त झाले नव्हते.