शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 17:03 IST

राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी १५ अटींचे पालन करण्याची हमी घेतल्यानंतरच परवानगी दिली होती. त्यातील बहुतांश अटीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.

औरंगाबाद : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर घेण्यात आलेल्या सभेत घालून दिलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी शहर पोलीस दलातील उपायुक्त अपर्णा गीते, निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे यांच्यासह इतर अधिकारी सकाळी ९ वाजेपासूनच राज ठाकरे यांच्या सभेत कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, याची छाननी करीत होते. रात्री उशिरापर्यंत छाननी सुरू होती. ठाकरे यांच्या सभेला परवानगी देताना एकूण १५ अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटींचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेली १६ वी अट होती. त्यादृष्टीने पोलिसांनी भाषणाची तपासणी केली. त्यानंतर गृह विभागाला दिलेल्या अहवालावरून पोलिसांनी आज राज ठाकरे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सभेला घातलेल्या अटी१) कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण करावा.२) सभेत स्वयंशिस्त पाळावी, हुल्लडबाजी करू नये.३) पोलिसांनी दिलेल्या मार्गावरूनच प्रवास करावा.४) कार्यक्रमादरम्यान शस्त्र आणू नये.५) येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या एक दिवस अगोदर सांगावी.६) सभास्थानी आसनव्यवस्था १५ हजार असल्यामुळे जास्त लोकांना बोलावू नये.७) सभेत वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इ.विषयी वादग्रस्त बोलू नये.८) ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज जाऊ नये.९) सभेसाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र आसनव्यवस्था असावी. पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.१०) कार्यक्रमात मिठाईसह अन्नपदार्थांचे वाटप होत असल्यास विषबाधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

प्रत्यक्ष परिस्थिती१) कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण झाला.२) सभेत मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची फेकाफेकी, हुल्लडबाजीही झाली.३) पोलिसांनी सांगितलेल्या मार्गावरून प्रवास केला.४) सभेत कुणाकडेही शस्त्रे, तत्सम वस्तू सापडल्या नाहीत.५) सभेसाठी एक दिवस अंदाजे येणारे लोक सांगितले.६) सभेला ३० ते ३५ हजार लोक जमले.७) जात, धर्मावर प्रखर टीका. दुसऱ्या धर्मावरही टिपणी८) आवाजाची मर्यादा ८४ डेसिबलपर्यंत पोहोचली.९) सभेसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था. स्वच्छतागृहाची वानवा.१०) अन्नपदार्थांचे वाटप केले नाही.

गृहमंत्रालयास अहवाल शहर पोलीस राज ठाकरे यांच्या सभेत झालेल्या नियमांच्या उल्लंघनाचा अहवाल राज्याच्या गृह विभागाला पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे गृह विभागाने आज दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. 

३० ते ३५ हजारांची गर्दीमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील सभेला ३० ते ३५ हजार लोकांची उपस्थिती असल्याचा अहवाल पोलिसांनी वरिष्ठांकडे सोपविला आहे. सभेसाठी १५ हजार खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती. खुर्च्या कमी पडल्यामुळे सभास्थळी उभारलेले पडदे काढून मैदानाच्या बाकड्यावर आलेले लोक बसले. एकूण मैदानाची क्षमता आणि त्यात लोकांना खुर्चीवर बसण्यासाठी लागणारी जागा, उभे राहिल्यानंतर किती लोक थांबू शकतात, त्यावरून पोलिसांनी ३० ते ३५ हजार लोकांची उपस्थिती असल्याचा अंदाज लावला आहे.

सभेत नियमांचे उल्लंघन, पोलिसांकडून दिवसभर छाननीराज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी १५ अटींचे पालन करण्याची हमी घेतल्यानंतरच परवानगी दिली होती. त्यातील बहुतांश अटीचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. १५ हजारांपेक्षा अधिक गर्दी जमवायची नाही, ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज होऊ नये, जातीय, धार्मिक विषयांवर बोलू नये, इ. बंधने घालण्यात आली होती. मात्र, ही सर्व बंधने झुगारून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ठाकरेंवर गुन्हा नोंदविण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांच्यासह इतर अधिकारी कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, त्याविषयी दिवसभर छाननी करीत होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMNSमनसे