शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:17 AM

शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.

ठळक मुद्देमहावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवरून ग्राहकाला अजब उत्तर

औरंगाबाद : शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य लढत बुधवारी झाली. हा सामना शेवटच्या टप्प्यावर असताना भारत पराभूत होतो का विजयी होतो, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली होती. नेमक्या त्या वेळी शहरात पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे पावसाच्या आगमनाने विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. उल्कानगरी परिसरातील वीजही गुल झाली होती. त्यामुळे रहिवासी सचिन ताम्हाणे यांनी महावितरणच्या ०२४०-२२४०१०८ या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला व ‘वीज कधी येणार’,अशी विचारणा के ली; परंतु समोरून मिळालेले उत्तर ऐकून ते चक्रावून गेले. ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असा उलट प्रश्न त्यांना करण्यात आला. या प्रकाराविषयी ताम्हाणे यांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती त्यांनी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या क्रमांकावर संपर्क साधून झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. मात्र, या क्रमांकावर कोण-कोण बोलतात, हे सांगता येणार नाही. दुपारपर्यंत नियमित कर्मचारी असतात. त्यानंतर लाईन स्टाफ असतो. मी सबस्टेशन आॅपरेटर आहे. याविषयी मला काही सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले.अपेक्षित उत्तर मिळावेदोष असून वीज येण्यास वेळ लागेल अथवा काही मिनिटांत वीज येईल, असे उत्तर देणे अपेक्षित असते; परंतु अजब उत्तर देण्यात आले. अनेकदा तर दूरध्वनी उचलला जात नाही.-सचिन ताम्हाणे, वीज ग्राहक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणRainपाऊस