शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी

By विकास राऊत | Updated: November 24, 2023 19:24 IST

हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्याने मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये, असे पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी शासनाला पत्र पाठविल्याचे वृत्त लोकमतने २४ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्तामुळे मराठा समाजामध्ये महामंडळाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर.तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांना घेरून समाजाची बदनामी करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा आणि जायकवाडीत पाणी सोडण्याचा दुरानव्ये संबंध नसतांना महामंडळाने समाजाची बदनामी केली आहे. या सगळ्याप्रकाराची चौकशी करण्यासाठी शिष्टमंडळाने दुपारपासून सायंकाळपर्यंत महामंडळात ठिय्या देत सगळ्या अधिकाऱ्यांना घेरले. सकल मराठा समाजाने गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कार्यकारी संचालक तिरमनवार यांच्या दालनात ठिय्या सुरू केला. संबंधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करुन आजच जायकवाडी पाणी सोडावे, अशी मागणी करीत शिष्टमंडळ आक्रमक झाले.

आरक्षणासाठी मराठा समाजा राज्यभरात शांतेत आंदोलन करीत असतांना जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी समाजाच्या आंदोलनाची आडकाठी असल्याचे दाखवून महामंडळाने समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय कार्यालयातून आंदोलन बदनाम केले जात आहे. हा सगळा प्रकार गोदावरी पाटबंधारे विभागाच्या पत्रावरुन पुढे आला असून लोकमतने ही बाब उजेडात आणल्यामुळे सरकारी यंत्रणेचे पितळ उघडे पडले.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कराउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजच जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आंदोलक शैलैश भिसे पाटील, प्रा चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, संदीप शेळके, संदीप जाधव, गणेश थोरात, विजय घोगरा, रविंद्र वहाटुळे यांनी केली.

असे आहे पत्रउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात करावी.

जाहीर माफी मागावीहा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणीMaratha Reservationमराठा आरक्षण