शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आईच्या काय आले मनात; पोटच्या चिमुकल्यांचा नाक, तोंड दाबून घोटला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:17 IST

निर्दयीपणे नाक-तोंड दाबून आईनेच दोन चिमुकल्यांना संपवले; औरंगाबादच्या सादातनगरातील येथील खळबळजनक घटना

औरंगाबाद : सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांच्या मुलाचे नाक-तोंड दाबून आईनेच खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सातारा पोलिसांनी दोन्ही चिमुकल्याच्या कुटुंबालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. मृतांमध्ये मुलगी अदिबा फहाद बसरावी (६) व अली फहाद बसरावी (४, दोघे रा. सादातनगर) यांचा समावेश आहे.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिबा व अली हे दोघे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर खोलीमध्ये झोपी गेले. सकाळी १२ वाजेपर्यंत ते खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यामुळे त्यांची आई त्यांना उठविण्यासाठी गेली. तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. याची माहिती कुटुंबातील इतरांना दिल्यानंतर दोघांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी दुपारी १:३० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दोघांच्या गळ्यावर किंवा तोंडावर कोणत्याही प्रकारचे व्रण नव्हते. त्यामुळे दोन्ही मुलांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याविषयी चर्चा करण्यात येत होती. 

घाटी रुग्णालयात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवालात दोघांचा मृत्यू नाक-तोंड दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक फाैजदार चंद्रभान गवांदे, तपासी अंमलदार एम. आर. अकोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना अनेक संशयास्पद बाबी आढळल्या. त्यामुळे मुलांच्या खुनाच्या प्रकरणात सर्वच कुटुंबाची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आईनेच पोटच्या दोन्ही मुलांना संपवल्याचे पुढे आले. सालेबीन हुसेन बसरावी ( 31) यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिसांनी आलीया फहाद बसरावी ( 22 ) विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

नातेवाइकांचा बोलण्यास नकारघाटी रुग्णालयात मुलांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. मुलांच्या मृत्यूविषयी एकही नातेवाईक बोलण्यास तयार नव्हते. मृत मुलाच्या वडिलाचे बाबा पेट्रोल पंप परिसरातील म्हाडा कॉलनीत किराणा दुकान आहे. या दुकानासाठी फहाद यांना त्यांचा भाऊ मदत करीत होता.

आईच्या डोक्यावर परिणामदरम्यान, सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलांच्या आईच्या डोक्यावर चार महिन्यांपूर्वी परिणाम झालेला आहे. सोमवारी सकाळपासून ती मुलांच्या खोलीतून बाहेर आलीच नाही. जेव्हा बाहेर पडली तेव्हा घटना उघडकीस आल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी