शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'विहीर चोरीस गेली आहे'; शेतकऱ्याच्या तक्रारीने उडाली खळबळ, जाणून घ्या नेमके प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:31 IST

The well has been stolen : सकाळी मी शेतात गेलो असता विहीर आढळून आली नाही.

ठळक मुद्देविहिरीची चोरी झाल्याने आर्थिक संकटात सापडलो शल मीडियावर विहीर चोरी झाल्याची तक्रार व्हायरल

सिल्लोड: तालुक्यातील अनाड गावातील एका शेतकऱ्याने चक्क विहीर चोरीस गेल्याची तक्रार अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. ही तक्रार पाहून पोलीसही चक्रावून गेले. यानंतर ही तक्रार सोशल मीडियात व्हायरल झाली. अखेर महसूल विभागाने तक्रारीची दखल घेऊन यावर पडदा टाकला.  

शेतकरी भावराव रंगनाथ गदाई यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, अनाड शिवारातील गट क्रमांक 189 मध्ये 88 आर जमीन आहे. सातबारा नोंदीप्रमाणे शेतात स्वतंत्र विहीर व कूपनलिका (बोअरवेल) आहे. शुक्रवारी सकाळी मी शेतात गेलो असता विहीर आढळून आली नाही. ती चोरी गेली आहे. मी शेतात मिरची लागवड करणार होतो. आता विहिरीची चोरी झाली. यामुळे मी आर्थिक संकटात सापडलो असून विहिरीचा शोध घ्यावा. अशी तक्रार शेतकरी गदाई यांनी पोलीस अधीक्षक, तहसीलदार, अजिंठा पोलीस येथे दाखल केली. यानंतर शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर विहीर चोरी झाल्याची तक्रार व्हायरल झाली. शेवटी या तक्रारीची तहसीलदारांनी दखल घेऊन प्रकरण निकाली काढले.

वर्षभरापासून शेतकरी आहे त्रस्तभावराव गदाई यांनी जानेवारी २०२० मध्ये शेतात बोअरवेल केली होती.त्याची पाहणी करून नोंद करण्यासाठी तलाठी शेतात आले होते. त्यांनी पाहणी करून  सातबारावर बोअरची नोंद घेतली पण विहीर नसताना सुद्धा विहिरींची नोंद घेतली. त्यामुळे आता विहिरीची मंजुरी मिळत नाही. यासाठी सातबारावरून विहिरींची नोंद हटवा म्हणून गेल्या वर्षभरापासून भावराव गदाई महसूल विभागात खेट्या घालत आहेत. मात्र, ती नोंद रद्द झाली नाही. यामुळे त्रस्त होऊन भावराव गदाई यांनी विहीर चोरी झाल्याची तक्रार केली.

विहीर मंजूर होत नाही मी अल्पभूधारक शेतकरी आहे व शासनाच्या योजने अंतर्गत मला शेतात विहीर घेयची आहे. मात्र, सातबारावर विहीरीची नोंद असल्याने मला नवीन  विहीर मंजूर होत नाही. फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात नाही. महसूल विभाग नोंद हटविण्यास तयार नाही आणि शेतात विहीर पण नाही अशा संकटात मी होतो.- भावराव रंगनाथ गदाई शेतकरी अनाड.

ही तर तलाठ्याची चूकसदर शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल आहे. नोंद घेताना तलाठ्याकडून चूक झाली असावी. शेतकऱ्याची तक्रारीची दखल घेऊन सातबारावरुन विहिरींची नोंद हटवली आहे. - विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद