शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
3
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
4
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
7
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
8
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
9
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
10
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
11
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
12
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
13
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
14
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
16
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
17
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
18
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे स्वागत करा, पण जपून; छत्रपती संभाजीनगरात दीड हजार पोलिस रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:20 IST

पहाटे ५ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जल्लोष; 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' कारवाईसाठी १५० वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक

छत्रपती संभाजीनगर : ‘थर्टि फर्स्ट’साठी तरुणाई सज्ज असून शहरातील शंभरावर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जंगी पार्ट्या, डीजे नाइटचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या वर्षाच्या स्वागताला अनुचित प्रकार टाळण्यासाठी दीड हजार पोलिस रस्त्यावर तैनात असतील. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी १५० वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक असून, ७० चौकांमध्ये प्रत्येकी १ अधिकारी, ५ अंमलदारांचे पथक टवाळखोरांना नियंत्रित ठेवेल.

बुधवारी सायंकाळी ६ वाजेपासूनच शहरात विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतांच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. देशातील प्रसिद्ध डीजेवादकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पार्ट्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाउन्सरलाही यंदा मोठी मागणी वाढली आहे. निवडणुकीच्या काळातच नव्या वर्षाचे स्वागत होत असल्याने पोलिस विभागानेही कठोर भूमिका घेतली आहे. नववर्षाच्या रात्री कायदा हातात घेणारे, सार्वजनिक शांततेचा भंग करणारे, छेडछाड, बेशिस्त वर्तन किंवा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांबाबत कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करा, असा आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला.

मर्यादा ओलांडल्यास कारवाईबुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरवर गाणे वाजविण्यास परवानगी असेल. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले म्हणाले.

डेसिबल मर्यादाक्षेत्र : सकाळी ६ ते रात्री १० - रात्री १० ते सकाळी ६औद्योगिक भाग : ७५-७०व्यावसायिक भाग : ६५-५५निवासी भाग : ५५-४५शांतता क्षेत्र : ५०-४०

असा असेल कडेकोट बंदोबस्त:-७० चौकांमध्ये प्रत्येकी १ पोलिस अधिकारी व ५ सशस्त्र अंमलदार-शहराच्या ६ प्रवेशाच्या ठिकाणी ९ पोलिसांचे चेकपोस्ट.-८ अधिकारी, ४० अंमलदारांची ८ पथके फिरती गस्त घालतील.-५ अधिकारी, २५ अंमलदारांचे ५ पथके ढाबे तपासतील. गुन्हे शाखेची २ पथकेही तपासणी करतील.- १ अधिकारी, ५ अंमलदारांची दोन पथके वादग्रस्त पोस्टर तपासतील.-नगर नाका, दौलताबाद टी पॉईंट, बायपास, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन, केंब्रिज चौक, क्रांती चौक व कॅनॉट प्लेसला विशेष बंदोबस्त.

पहाटे ५ पर्यंत रेस्टॉरंट, बारदरवर्षीप्रमाणे पहाटे ५ पर्यंत बार, रेस्टॉरंट, हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी असेल. वाइन शॉप रात्री १ पर्यंत सुरू राहतील.

पाच पथकांद्वारे गस्तदि. ३१ डिसेंबरला शहरासह लगतच्या परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची विक्री, प्राशन केली जाते. यासाठी राज्य उत्पादन शुल्कची ५ भरारी पथके नियुक्त केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Welcome New Year cautiously; 1500 police on streets in Sambhajinagar.

Web Summary : Chattrapati Sambhajinagar is ready for New Year's Eve with heavy police presence. 1500 police personnel will patrol to prevent incidents. Strict action against drunk driving and public disturbance is planned. Restaurants and bars can stay open until 5 AM.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसNew Yearनववर्ष 2026