संत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबानगरीत स्वागत
By Admin | Updated: June 25, 2014 01:03 IST2014-06-25T00:03:19+5:302014-06-25T01:03:48+5:30
अंबाजोगाई: आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेली श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन मंगळवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरात झाले.

संत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबानगरीत स्वागत
अंबाजोगाई: आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेली श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन मंगळवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरात झाले. येथील अण्णा भाऊ साठे चौकात पालखीचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत व पुष्पहाराने पालखीचे व पायी दिंडीत आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केला.
पालखी अण्णा भाऊ साठे चौक, परळीवेस, खडकपुरा, कुत्तरविहीर, भटगल्ली, मंडीबाजार मार्गे योगेश्वरी मंदिरात पोहोचली.
योगेश्वरी मंदिरात व्यापाऱ्यांच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी पालखीचे जोरदार स्वागत झाले. पालखीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीच्या स्वागतासाठी नगराध्यक्षा रचना मोदी, उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा, आ. पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. (वार्ताहर)