पालखीचे उत्साहात स्वागत
By Admin | Updated: July 5, 2014 00:41 IST2014-07-04T23:59:34+5:302014-07-05T00:41:24+5:30
परंडा : नगर जिल्ह्यातील भगवान गढावरुन भगवान बाबाच्या पालखीचे तर ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या आपेगाववरुन ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचे परंड्यात आगमण झाले.
पालखीचे उत्साहात स्वागत
परंडा : नगर जिल्ह्यातील भगवान गढावरुन भगवान बाबाच्या पालखीचे तर ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या आपेगाववरुन ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचे परंड्यात आगमण झाले. येथील कल्याणसागर विद्यालयात पालखीतील वैष्णवांनी महाप्रसाद घेतला. दुपारी १ च्या सुमारास भगवान बाबाच्या पालखीने पढंरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
सायंकाळी माउलीच्या पालखीने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाड्यावर विसावा घेतला. दरम्यान, भगवान बाबा महाराजांच्या पालखीचे सकाळी १०.३० च्या सुमारास भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी स्वागत केले. यावेळी अॅड संतोष सुर्यवंशी, राजाभाऊ चौधरी, गोपाल ठाकूर, अब्दुल शेख, मन्नान बासले, संदिप शहा, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, किरण गरड, मनोज ठाकूर, जगन्नाथ डाके, आजित पाटील, कृष्णा चैतन्य, सचिन ठाकूर, सुजितसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती.
सायंकाळी ६ च्या सुमारास शहरातील कासीम बाग येथे ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखीचे माजी नगराध्यक्षा सिंधूताई डाके, मधुकर डाके, नागेश डाके, उल्हास डाके आदीनी स्वागत केले. त्यानंतर सायकांळी ७ च्या सुमारास माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाड्यावर पोहचली. तेथे ज्ञानेश्वर पाटील, सिध्देश्वर पाटील, रणजितसिंह पाटील, पिंटू पाटील, आदींनी पालखीचे स्वागत केले. या वाड्यावर पालखी मुक्कामी राहणार असून, शनिवारी पहाटे पालखी कुर्डवाडीकडे रवाना होणार आहे. (वार्ताहर)
रेवणनाथ स्वामी दिंडीचे स्वागत
आनाळा : भूम तालुक्यातील ईट येथून निघालेल्या रेवणनाथ स्वामी यांच्या दिंडीचे आनाळा, कुक्कडगाव येथे कल्याणी हायस्कूलचे अध्यक्ष महादेवदादा अंधारे यांनी स्वागत केले. यावेळी बिभीषण खामकर, अॅड. दादासाहेब खरसडे, दिलीप पाटील, विजयसिंह थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.