मुक्तार्इंच्या पालखीचे उत्साहात स्वागत
By Admin | Updated: June 27, 2014 00:10 IST2014-06-26T23:10:05+5:302014-06-27T00:10:11+5:30
बीड: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुक्ताई पालखीचे गुरूवारी बीड शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील चौका-चौकात आतषबाजी करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले.

मुक्तार्इंच्या पालखीचे उत्साहात स्वागत
बीड: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुक्ताई पालखीचे गुरूवारी बीड शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील चौका-चौकात आतषबाजी करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. याप्रसंगी सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताई नगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या मुक्ताई पालखीचे बीडमध्ये आगमन झाले. यावेळी पंचक्रोशितील भाविकांनी शहरातील साठे चौक, सुभाष रोड भागात गर्दी केली होती. पालखीच्या दर्शनासाठी महिलांची देखील मोठी गर्दी होती. ज्ञानोबा- तुकाराम च्या जयघोषात बीड शहर दुमदुमून गेले होते. पालखीत सहभागी भाविकांच्या चहा-पाण्याची व्यवस्था शहरातील विविध भागात भाविकांनी केली होती.
आदर्श मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने मुक्ताईच्या पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती. चोख बंदोबस्तात पालखीतील वारकऱ्यांना सुभाष रोड मार्गे माळीवेस येथील हनुमान येथे पोहचविण्यात आले. येथे वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीधरपंत उर्फ गोविंद पंत हे मुक्तार्इंचे आजोबा असून शनिवारी सकाळी मुक्तार्इंची पालखी गोविंदपंतांच्या पालखीस्थळी दाखल होईल. यावेळी मुक्ताई व त्यांचे आजोबा श्रीधरपंत यांची भेट होईल. मुक्तार्इंच्या पादुकांचे पूजन करण्यात येणार असून साडीचोळीचा आहेर दिला जाणार आहे. त्यानंतर मुक्तार्इंच्या पालखीचे प्रस्थान होईल. (प्रतिनिधी)
वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
स्व.गंगाभिषणजी बियाणी सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने पालखीतील वारकऱ्यांची नवगण प्लाझा येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. पूजा बियाणी, डॉ. विजय चरखा, डॉ. शाम झंवर, डॉ. सचिन जेथलिया, डॉ. शैलेश बाहेती, डॉ. बी.जी. झंवर, डॉ. संतोष लड्डा यांनी परिश्रम घेतले. बालकिशन बियाणी, कैलास बियाणी, भगीरथ बियाणी उपस्थित होते.