राज्यमंत्र्यांचे टाळ, मृदंगाच्या गजरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:37+5:302021-09-23T04:06:37+5:30
राज्यातील संस्कृती व सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम वारकरी संप्रदायाकडून होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी सत्तार यांनी काढले. राज्यातील वारकरी शिक्षण ...

राज्यमंत्र्यांचे टाळ, मृदंगाच्या गजरात स्वागत
राज्यातील संस्कृती व सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम वारकरी संप्रदायाकडून होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी सत्तार यांनी काढले. राज्यातील वारकरी शिक्षण संस्थेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व गावकऱ्यांसाठी त्यांनी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्याची घोषणा करून नियोजित जागेवर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन त्यांनी केले. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे गणेश महाराज थोरात, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, डॉ. संजय जामकर, मार्केट कमिटीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, मारुती वराडे आदींची उपस्थिती होती.
फोटो :
220921\img_20210922_182018.jpg
क्याप्शन
वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा टाळ, मृदुंगाच्या गजरात, पुष्पांची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.यावेळी मान्यवर दिसत आहे.