हिंगोली शहरात पालखीचे स्वागत
By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T00:38:08+5:302014-06-09T01:12:36+5:30
हिंगोली : गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ पालखीची महाराष्ट्रभर परिक्रमा सुरू झाली असून, या पालखीचे ७ जून रोजी हिंगोलीत भाविकांनी उत्साहात स्वागत केले.

हिंगोली शहरात पालखीचे स्वागत
हिंगोली : गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ पालखीची महाराष्ट्रभर परिक्रमा सुरू झाली असून, या पालखीचे ७ जून रोजी हिंगोलीत भाविकांनी उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी शहरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती.
हिंगोली शहरातील नाईक नगर भागात ७ जून रोजी सायंकाळी अॅड. बी.जी. खंदारे यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीद्वारे पालखी केमिस्ट भवनमध्ये पोहोचली. रात्री ७.३० वाजता आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शनिवारी रात्री केमिस्ट भवन येथे पालखीचा मुक्काम झाला. ८ जून रोजी सकाळी ७ वाजता महाभिषेक व आरती झाल्यानंतर ८ वाजता औंढा नागनाथ मार्गे पालखीचे नांदेडला प्रस्थान झाले. यासाठी अॅड. बी.जी. खंदारे, जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अॅड. सुभाष ठोंबरे, अॅड. श्रीधर घुगे, अॅड. आर. टी. शिंदे, अॅड. के. एन. कोटकर, अॅड. एस. एम. पठाडे, अॅड. डी. जे. पवार, अॅड. एन. एस. घुगे, अॅड. विजेंद्र टाले, राजर्षी खंदारे, उन्हाळे, खके, वडकुते, रजनी पाटील, पवार, सुमित्रा डिडाळे, वर्षा पाटील, रोहिणी जयेश खर्जूले, नंदा घुगे, नागेश खिल्लारे, मांगुळकर, संतोष डहाळे, दीपक अंधारे, गाडे, महाजन, प्रा. गरूड, ठाकूर, पवन अग्रवाल, पाटील, नाईक, सुभाष कोरडे, शिवाजी टोम्पे, बालाजी टोम्पे, सचिन लोलगे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)