आरोग्य केंद्र करणार कन्या जन्माचे स्वागत
By Admin | Updated: July 27, 2014 01:14 IST2014-07-27T00:35:33+5:302014-07-27T01:14:53+5:30
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक २५ जुलै रोजी झाली.
आरोग्य केंद्र करणार कन्या जन्माचे स्वागत
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक २५ जुलै रोजी झाली. या बैठकीत केंद्रामध्ये जन्मणाऱ्या कन्येला कपडे व अन्य उपयोगी साहित्य देऊन स्वागत करण्याचा ठराव घेण्यात आला.
बैठकीला समिती अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या पार्वती घोडके, सदस्य काशिनाथ बंडगर, पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, सरपंच शशिकला शेटे, बाबई चव्हाण, डॉ. सचिन यतनाळकर, सत्यशिला चव्हाण, धनराज मुळे, प्रबोध कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समितीच्या बैठकीला सुरूवात होताच उपस्थितांनी औषधांचा तुटवडा भासत असल्याची ओरड केली. त्यामुळे रूग्णांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याचेही नमूद केले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन्मणाऱ्या कन्यांचे स्वागत करण्याचा ठराव घेण्यात आला. मुलीसाठी कपडे आणि उपयोगी पडणारे साहित्य देण्याचे ठरले. आशा कार्यकर्त्यांनाही काही कामासाठी मानधन दिले जात नाही. अशावेळी रूग्ण कल्याण समितीच्या उपलब्ध निधीतून मानधन देण्याचे ठरले. बैठकीला मुख्याध्यापिका नवल गोवे, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक चिंचोले, आशा समुह संघटक साळुंके यांच्यासह आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)