आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत

By Admin | Updated: June 29, 2014 00:26 IST2014-06-29T00:01:20+5:302014-06-29T00:26:26+5:30

परभणी : राज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण घोषित केले. या निर्णयाचे विविध पक्ष संघटनांकडून स्वागत करण्यात आले.

Welcome decision of reservation | आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत

आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत

परभणी : राज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण घोषित केले. या निर्णयाचे विविध पक्ष संघटनांकडून स्वागत करण्यात आले.
संभाजी सेना
संभाजी सेनेच्या वतीने शिवाजी चौक येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, गजानन लव्हाळे, सतीश टाक, सुधाकर सोळंके, दौलत शिंदे, अरुण पवार, विष्णू ढगे, दत्ता शिंदे, बाळू चोपडे, विजय बेले, प्रवीण डहाळे, किरण तळेकर, गजानन पवार, भगवान लांबाळे, अर्जुन कुरील, मनीष तुपसमिंद्रे, माधव खुणे आदी उपस्थित होते.
४मुस्लिम विकास परिषद
मुस्लिम विकास परिषदेची बैठक घेण्यात येऊन मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजीत पवार, अल्पसंख्याकमंत्री आरेफ नसीम खान यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सत्तार इनामदार म्हणाले, मुस्लिम विकास परिषदेने १५ वर्षांपासून विविध आंदोलने करुन समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. आता त्याचा फायदा समाजाला होईल. संघटन करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. समाजाने जागृत होऊन संघर्ष केला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष उस्मान, प्रदेश सचिव सलीम शेख, डॉ.एम.ए. रशीद, मन्सूर खान पठाण, मुखीद अन्सारी, शेख रोशन, शब्बीर हुसेन, पाशूभाई पटेल, हमीदखान पठाण, फईज शेख, मो.सिराज, हरुण पठाण, शाहीन पठाण, निसार पटेल आदी उपस्थित होते. डॉ.एम.रशीद यांनी सूत्रसंचालन केले. इलियास खतीब यांनी आभार मानले.
ऐतिहासिक निर्णय-देशमुख
मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची होती. अनेक वर्षे सत्तेत राहूनही सामान्य मराठा समाजाला फायदा झाला नाही. उलट मराठा व मुस्लिम समाज आर्थिक दृष्टीने क्रांती करु शकला नाही. त्यामुळे या दोन्ही समाजाला आरक्षण देणे आवश्यक होते. शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
मुस्लिम सेवासंघ
मुस्लिम व मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण निर्णयाचे मुस्लिम सेवासंघाने स्वागत केले आहे. संस्थापक अध्यक्ष शेख महेमुद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आरक्षण केवळ घोषणेपुरते न राहता त्याला घटनात्मक वैधता प्राप्त करुन लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असे मत शेख महेमुद यांनी व्यक्त केले. बैठकीस शेख आरेफ अजिमोद्दीन, मिर्झा अबरार बेग, शेख खलील, शेख मोईन, शेख सईद, शेख सादेक मुखीद, डॉ.पठाण मुबीन खान आदींची उपस्थिती होती.
प्रदेश काँग्रेसच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव इरफार उर रहेमान खान यांनी सांगितले, २००४ पासून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासासाठी २४ मागण्या न्या.राजेंद्र सच्चर समिती व रंगनाथ मिश्रा समितीकडे लेखी स्वरुपात सादर केले होते व त्या समितीने मान्य केल्या. वरील २४ मागण्यापैकी मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी होती. या निर्णयामुळे इरफान उर रहेमान खान यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
एनएसयुआय
मराठा व मुस्लिम समाजाला जाहीर केल्याच्या निर्णयाचे एनएसयुआयच्या वतीने फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रताप देशमुख, नितीन कदम, पप्पू मगर, गजानन वायचाळे, अतुल जाधव आदी उपस्थित होते.
आरक्षणामुळे प्रगतीची दारे खुली- दुर्राणी
मराठा व मुस्लिम समाजासाठी आघाडी शासनाने आरक्षण जाहीर केल्याने दोन्ही समाजातील युवक- विद्यार्थ्यांना नोकरी, शिक्षण तसेच आर्थिक प्रगतीची दारे खुली होणार असल्याची प्रतिक्रिया आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दिली. मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांची अपेक्षित प्रगती झालेली नाही. परिणामी आर्थिक क्षेत्रातही पिछाडी होत असल्याचे लक्षात आल्याने आपण ६ जून रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच मुस्लिम समाजातही ५९ टक्के समाज आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असल्याने त्यांच्या उत्कर्षासाठी माजी केंद्रीय सचिव डॉ. महेमुद्दूर रहेमान यांचा अहवाल स्वीकारुन मुस्लिमांनाही आरक्षण द्यावे, याकडे विधान परिषदेत ५ जून रोजी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. वरील दोन्ही मागण्यांची दखल घेत शासनाने आरक्षण दिल्याने दोन्ही समाजातील युवक- विद्यार्थ्यांना प्रगतीची दारे खुली झाली आहेत, असे दुर्राणी यांनी सांगितले.
‘वनामकृवि’त स्वागत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या निर्णयाचा जल्लोष केला. मराठा समाजाला आरक्षण जाहीर होताच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दिलीप मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी टी.आर. कदम, किरण डोंबे, सचिन फुणे, शिंदे, श्रीकांत देशमुख, दिनेश जगताप, ज्ञानेश्वर कदम, शिवाजी माने, कृष्णा होगे, धिरज गुंजाळ, आमटे, विकास हाके, संतोष इंगळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Welcome decision of reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.