लातूर परिमंडळात १४ फिडरवर भारनियमन
By Admin | Updated: July 27, 2015 01:11 IST2015-07-27T00:59:37+5:302015-07-27T01:11:38+5:30
लातूर : लातूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या लातूर, बीड, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यातील गळतीचे व वीज चोरीचे प्रमाण ४२ ते ७० टक्क्यावर आलेली आहे़

लातूर परिमंडळात १४ फिडरवर भारनियमन
लातूर : लातूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या लातूर, बीड, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यातील गळतीचे व वीज चोरीचे प्रमाण ४२ ते ७० टक्क्यावर आलेली आहे़ त्यामुळे लातूर परिमंडळातील १४ फिडरवर भारनियमन आले आहे. भारनियमनात वाढ झाल्याने ६० हजार ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.
लातूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १४ फिडरअंतर्गत वीजचोरी व गळतीचे प्रमाण आहे. एका फिडरवर किमान ५ हजार ग्राहक आहेत. ६० हजार ग्राहक या फिडरअंतर्गत आहेत. आता या ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागणार आहे. जोपर्यंत गळती व वीजचोरीचे प्रमाण आटोक्यात येत नाही, तोपर्यंत या फिडरवरून भारनियमन राहणार आहे. निलंगा तालुक्यातील ११ के.व्ही. अंतर्गत येणाऱ्या अशोक नगर, शिरसी हंगरगा व सिंदखेडा आदी ठिकाणी भारनियमन सुरु आहे़ लातूर ग्रामीणमध्ये तीन व शहरात तीन अशा सहा फिडरवर भारनियमन राहणार आहे. ३० हजार ग्राहकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)
१४ फिडरअंतर्गत मोठ्या प्रमाणात वीज गळती व वीज चोरीचे प्रमाण वाढलेले आहे़ त्यामुळे परिमंडळातील अनेक फिडरचा ई.एफ.जी. गटात समावेश झालेला आहे़ यामध्ये ई गटातील ग्राहकांना ६़१५ तासाचे भारनियमन, एफ गटातील ग्राहकांना ७ तास, जी गटातील जी १, जी २, जी ३ गटातील ग्राहकांना ७़४५ ते ९़४५ तास भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे़
लातूर परिमंडळाअंतर्गत लातूर, बीड, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यातील वीज गळती व विद्युत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणने खाजगी फिडर फ्रेंचायसी पद्धतीने वाढीव अभियंते व इतर इलेक्ट्रीयशन झालेल्या तरुणानी भरती करुन वीज गळतीचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे लातूर परिमंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले असून, यामुळे परिमंडळातील ६० युवकांना रोजगारही मिळणार आहे़